28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeपरभणीनवीन वर्षात लाईन ब्लॉकमुळे काही रेल्वेगाड्या रद्द

नवीन वर्षात लाईन ब्लॉकमुळे काही रेल्वेगाड्या रद्द

परभणी : मथुरा रेल्वे स्थानकावर यार्ड रेमॉडेलिंगचे काम करण्यासाठी घेण्यात येणा-या मेगा लाईन ब्लॉकमुळे नांदेड येथून अमृतसर, जम्मूतावी व हजर निजामुद्दीन या शहरांकडे धावणा-या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असल्याचे उत्तर मध्य रेल्वे विभागाने कळविले आहे. तसेच परतीच्या प्रवासातील देखील या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे लांब पल्लयाचा प्रवास करणा-या प्रवाशांना मात्र अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

उत्तर प्रदेशातील मथुरा रेल्वे स्थानकावर रेल्व कामांसाठी मेगा लाईन ब्लॉक घेण्यात येणार असल्याचे उत्तर मध्य रेल्वे विभागाने कळवले आहे. यामुळे रद्द करण्यात आलेल्या गाड्या पुढील प्रमाणे आहेत. यात नांदेड येथून सुटणारी गाडी क्र. १२७१५ नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस दि.२१ जानेवारी ते ४ फेब्रुवारी २०२४ दरम्यान रद्द करण्यात आली आहे. अमृतसर येथून सुटणारी गाडी क्र. १२७१६ अमृतसर-नांदेड सचखंड एक्स्प्रेस दि.२३ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२४ दरम्यान रद्द करण्यात आली आहे. याशिवाय नांदेड येथून सुटणारी गाडी क्र. १२७५१ नांदेड-जम्मू तावी हमसफर साप्ताहिक एक्स्प्रेस दि. २६ जानेवारी आणि २ फेब्रुवारी २०२४ रोजी रद्द करण्यात आली आहे. तर जम्मू तावी येथून सुटणारी गाडी क्र. १२७५२ जम्मू तावी-नांदेड हमसफर साप्ताहिक एक्स्प्रेस दि.२८ जानेवारी आणि ४ फेब्रुवारी २०२४ रोजी रद्द करण्यात आली आहे. तसेच नांदेड येथून सुटणारी गाडी क्र. १२७५३ नांदेड-हजरत निजमुदिन साप्ताहिक एक्स्प्रेस दि. २३ आणि ३० जानेवारी २०२४ रोजी रद्द करण्यात आली आहे. हजरत निजमुदिन येथून सुटणारी गाडी क्र. १२७५४ हजरत निजमुदिन- नांदेड साप्ताहिक एक्स्प्रेस दि.२४ आणि ३१ जानेवारी २०२४ रोजी रद्द करण्यात आली आहे.

दिल्लीच्या दिशेने धावणा-या या एक्सप्रेस रद्द करण्यात आल्यामुळे या गाड्यांचे रिझर्वेशन करून ठेवलेल्या प्रवाशांना मात्र अडचणींचा सामना करावा लागणार आहे. याबद्दल प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसून येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR