27.5 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeमहाराष्ट्रनवाब मलिक यांचे जावई कार अपघातात जखमी

नवाब मलिक यांचे जावई कार अपघातात जखमी

मुंबई : मुंबईतील कुर्ला येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आमदार नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या कारला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात समीर खान जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नवाब मलिक यांची मुलगी आणि जावई रुग्णालयात नियमित तपासणी करून परतत असताना ही दुर्घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

नवाब मलिक यांची मुलगी आणि जावई नियमित तपासणी करण्यासाठी कुर्ल्यातील एका रुग्णालयात गेले होते. तपासणी करून घरी परतत असताना त्यांच्या कारला अपघात झाला. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर खान हे कारमध्ये चढत असताना कारचालकाने चुकून अ‍ॅक्सिलेटर दाबले आणि कार भिंतीवर आदळली.

या घटनेत समीर खान यांच्या डोक्याला तसेच चेह-यालाही दुखापत झाली असून, त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी कार चालक अबुल अन्सारी याला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR