28.6 C
Latur
Thursday, June 12, 2025
Homeराष्ट्रीयसोनिया गांधींना उपचारानंतर रुग्णालयातून सुटी

सोनिया गांधींना उपचारानंतर रुग्णालयातून सुटी

रक्तदाब वाढल्याने शिमल्यात केले उपचार

शिमला : शनिवारी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचा रक्तदाब अचानक वाढला असता त्यांना उपचारासाठी शिमला येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज (आयजीएमसी) रुग्णालयात आणण्यात आले. येथे डॉक्टरांच्या पथकाने त्यांची तपासणी केल्यानंतर रुग्णालयातून गांधी यांना सुटी देण्यात आली.

आयजीएमसीचे उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. अमन चौहान म्हणाले की, घाबरून जाण्याची गरज नाही. सोनिया गांधी पूर्णपणे निरोगी आहेत. रक्तदाब वाढल्याची तक्रार करून त्या नियमित तपासणीसाठी रुग्णालयात आल्या होत्या. तपासणीनंतर त्या निघून गेल्या. दरम्यान, मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू यांचे प्रमुख माध्यम सल्लागार नरेश चौहान म्हणाले की, सोनिया गांधी यांना काही किरकोळ आरोग्य समस्यांमुळे नियमित तपासणीसाठी रुग्णालयात आणण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. सोनिया गांधी २ जून रोजीच त्यांची मुलगी प्रियंका गांधी यांच्यासोबत शिमला येथे आल्या होत्या. त्या इथे छराबरा येथील त्यांच्या फार्म हाऊसवर राहत आहेत.

आयजीएमसीबाहेर सुरक्षा कर्मचारी तैनात
उन्हाळी सुटीवर शिमलाला येते गांधी कुटुंब प्रियंका गांधी यांचे शिमलापासून १३ किमी अंतरावर असलेल्या छराबरा येथे एक फार्महाऊस आहे. हे घर डोंगराळ शैलीत बांधलेले आहे. आतील भाग देवदाराच्या लाकडाने सजवलेला आहे. घराभोवती हिरवळ आणि सुंदर पाइन वृक्ष आहेत. समोर हिमालयाचे बर्फाच्छादित पर्वत दिसतात. सोनिया, प्रियंका आणि राहुल गांधी अनेकदा उन्हाळ्याच्या सुट्या घालवण्यासाठी येथे येतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR