17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeधाराशिवअपघातग्रस्त ट्रकमधील साडेपाच लाखाचे सोयाबीन लंपास

अपघातग्रस्त ट्रकमधील साडेपाच लाखाचे सोयाबीन लंपास

धाराशिव : प्रतिनिधी
सोयाबीन घेऊ़न सोलापूरकडे जाणा-या ट्रकचा अपघात झाल्याने तो ट्रक कळंब तालुक्यातील जवळा पाटी येथे थांबला होता. यावेळी चोरट्यांनी साडेपाच लाखाचे सोयाबीन लंपास केले. ही घटना ४ नोव्हेंबर रोजी पहाटे घडली. या प्रकरणी शिराढोण पोलीस ठाणे येथे ५ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, ट्रकचालक दिलीप तुकाराम लटपटे रा. लाडेगाव ता. केज जि. बीड हे त्यांच्या मालकीच्या ट्रकमध्ये सोयाबीनचे ३३५ पोते भरुन परतुर ते सोलापूर जात होते.

त्याच्या ट्रकचा कळंब तालुक्यातील जवळा पाटीचे पुढे काही अंतरावर अपघात झाला. यावेळी चोरट्यांनी अपघातग्रस्त ट्रकमधील सोयाबीनचे २१६ पोते अंदाजे किंमत ५ लाख ५० हजार रूपये किंमतीचे चोरट्यांनी लंपास केले. या प्रकरणी फिर्यादी दिलीप लटपटे यांनी दि.५ नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पोलीस ठाणे येथे कलम ३७९ भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR