सोलापूर : महापालिकेच्या वतीने विशेष स्वच्छता मोहीम २.० व नेटक्या पद्धतीने नियोजनपूर्वक कोराबविण्यात येत आहे. शेळगी लेपुल तुळजापूर नाका पूल, सिंधू न विहार कॉलनी यासह आठ झोन , अंतर्गत विविध अंतर्गत रस्त्यांची साफसफाई करण्यात आली. विशेष म्हणजे, सहायक आयुक्त मनिषा मगर या आपल्या लहान मुलासोबत कर्तव्यावर हजर होत्या.
महापालिका आयुक्त शितल तेली उगले यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या नियंत्रणाखाली १० ते २२ फेब्रुवारी दरम्यान न्य सकाळी ६.३० ते ११ वाजेपर्यंत सोलापूर महापालिका प्रशासनाने शहरातील अंतर्गत रस्ते साफसफाई करण्यासाठी विशेष स्वच्छता मोहीम २.० राबविण्यात येत आहे.
मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, अनिल चराटे माध्यमातून आरोग्य निरीक्षक आणि कर्मचारी पथकांकडून नियोजनपूर्वक स्वच्छतेची कामे करण्यात येत आहेत.दरम्यान, अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी विविध ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली. कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देऊन नेटक्या पद्धतीने स्वच्छता करून घेतली.
या मोहिमे अंतर्गत शेळगी पूल, तुळजापूर नाका पुलाच्या दुतर्फा स्वच्छता करण्यात आली. मातीचे ढिगारे काढण्यात आले. सिंधू विहार कॉलनी परिसर यासह विविध रस्त्यांची साफसफाई करण्यात आली. त्या त्या रस्त्यावरील मुता-या स्वच्छ करणे, डिव्हायडर, रस्त्याच्याृृ कडेची सर्व अनावश्यक साहित्य, कचरा, प्लास्टिक उचलणे, रस्त्याच्या कडेची झाडांची छाटणी करणे, फुटपाथही पाण्याने स्वच्छ धुऊन घेणे आदी स्वच्छतेची कामे करण्यात आली.