25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रराज्य सरकारचे विशेष आभार व कौतुक!

राज्य सरकारचे विशेष आभार व कौतुक!

मुंबई : मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत मंजूर झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व राज्य सरकारचे विशेष आभार व कौतुक! अशी प्रतिक्रिया स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे.

मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे, यासाठी आधी मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध करणे गरजेचे आहे, त्यासाठी शासनाने राज्य मागासवर्ग आयोग गठित करून मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध करावे, ही मागणी घेऊन मी गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा करत होतो.

शासनाने ही मागणी मान्य करत मराठा समाजाच्या मागासलेपणाचे सर्वेक्षण करून मराठा समाजास आरक्षण लागू केले, याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व राज्य सरकारचे विशेष आभार व कौतुक! अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करून हे आरक्षण न्यायालयात टिकविण्याची जबाबदारी देखील शासनाने कटाक्षाने पार पाडावी.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR