22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeसोलापूरअकोला-आदिलाबादहून आषाढीसाठी विशेष रेल्वे गाड्या

अकोला-आदिलाबादहून आषाढीसाठी विशेष रेल्वे गाड्या

सोलापूर : आषाढी यात्रेनिमित्त महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातून व इतर राज्यांतून लाखोंच्या संख्येने भाविक, वारकरी पंढरपुरात येतात. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाद्वारे अकोला, आदिलाबाद व नागरसोल येथून आणखी विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, नागरसोल पंढरपूर विशेष एक्स्प्रेस १६ जुलै रोजी नागरसोल रेल्वे स्थानकाहून संध्याकाळी ७ वाजता निघणार आहे. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ११:३० वाजता पंढरपूर रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. पंढरपूर नागरसोल विशेष एक्स्प्रेस १७ जुलै रोजी पंढरपूर रेल्वे स्थानकाहून रात्री ११:५५ वाजता निघणार असून, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ८ वाजता नागरसोल रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. या गाडीला नागरसोल, रोटेगाव, लासूर,औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, बार्शी टाऊन, कुईवाडी आणि पंढरपूर असे थांबे राहणार असून, या गाडीला २० डबे असणार आहेत. आदिलाबाद-पंढरपूर विशेष एक्स्प्रेसही १६ जुलै रोजी आदिलाबाद रेल्वे स्थानकाहून सकाळी ९ वाजता निघणार आहे आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजता पंढरपूर रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. पंढरपूर आदिलाबाद विशेष एक्स्प्रेस ही १७जुलै रोजी पंढरपूर रेल्वे स्थानकाहून रात्री ८ वाजता निघणार आहे आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ३ वाजता आदिलाबाद रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. या गाडीला आदिलाबाद, किनवट, बोधडी बुजरुग, सहस्त्रकुंड, हिमायतनगर, भोकर, मुदखेड, नांदेड, पूर्णा जं., परभणी जं., गंगाखेड, परळी वैजनाथ, पारगाव, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, बार्शी टाऊन, कुर्डवाडी आणि पंढरपूर असे थांबे असणार आहेत.

अकोला – पंढरपूर विशेष एक्स्प्रेस ही १६ जुलै रोजी
अकोला रेल्वे स्थानकाहून सकाळी ११ वाजता निघणार असून, दुसऱ्या दिवशी सकाळी १०:५० वाजता पंढरपूर रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. पंढरपूर अकोला विशेष एक्स्प्रेस १७ जुलै रोजी पंढरपूर रेल्वे स्थानकाहून रात्री ९:४० वाजता निघणार असून, दुसऱ्या दिवशी रात्री ८ वाजता अकोला रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. या गाडीला अकोला, वाशिम, हिंगोली, वसमत, पूर्णा जं., परभणी जं., गंगाखेड, परळी वैजनाथ, पारगाव, लातूर रोड, उदगीर, भालकी, बिदर, जाहिराबाद, विकाराबाद, तांदूळ, सेराम, चितपूर, वाडी, कलबुर्गी, सोलापूर, कुईवाडी आणि पंढरपूर असे थांबे असणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR