पाटणा : भरधाव जाणा-या रिक्षाने मेट्रोला धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. पाटण्यात ही दुर्घटना घडली आहे. भरधाव वेगात असलेल्या रिक्षाची मेट्रो क्रेनला धडक बसली, ज्यामध्ये ७ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.
राजधानी पाटणा येथे एक मोठी दुर्घटना घडली. भरधाव वेगात असलेल्या रिक्षाची मेट्रो क्रेनला धडक बसली. ज्यामध्ये ७ जणांचा मृत्यू झाला. नवीन बायपास परिसरातील रामलखन पथावर ही घटना घडली आहे. मृतांमध्ये लहान मुले आणि महिलांचाही समावेश आहे. सर्व मृतदेह पीएमसीएच येथे पाठवण्यात आले आहेत. हा भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
घटनेनंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. स्थानिक आणि प्रवासी यावेळी मदतीला धावले. या अपघातामध्ये ७ जणांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयाच दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये ज्या लोकांची ओळख पटली आहे, त्यात उपेंद्र कुमार, लछमन दास, अभिनंदन कुमार, इंद्रजित कुमार, पिंकी देवी, नेहा प्रियदर्शी आणि राणी कुमारी यांचा समावेश आहे. मोतिहारी रहिवासी मुकेशकुमार साहनी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पत्नी पिंकी देवी, मुलगा अभिनंदन आणि मुलगी राणी कुमारी यांचा समावेश आहे.