22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeसोलापूरशिवगर्जना महानाट्यास सोलापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवगर्जना महानाट्यास सोलापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सोलापूर— राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वषर्षानिमित आयोजित केलेल्या ‘शिवगर्जना महानाट्य चे उद्‌घाटन आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मनपा आयुक्त शीतल तेली-उगले, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, निवासी उपजिलाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, महानाट्य दिग्दर्शक स्वप्निल यादव होते.

शिवगर्जना महानाट्यात जवळपास अडीचशे कलाकार सहभागी असून, थोडे, उंट व हसी हे प्राणी बात आहेत. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मापासून ते त्यांच्या राज्याभिषेकापर्यंतचे सादरीकरण महानाट्याच्या माध्यमातून केले जाणार आहे. हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर हे महानाट्ध पाहण्यासाठी नागरिकांना प्रवेश विनामूल्य आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिवप्रेमी नागरिकांनी पुढील दोन दिवस या महानाटयचा लाभ घ्यावा, असे आवाहनही आमदार देशमुख यांनी केले.

जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी महानाट्य आयोजनाचा उद्देश सांगून हे महानाट्य पाहण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे. बासाठी प्रशासनाने आवश्यक ते नियोजन केल्याची माहिती दिली. यावेळी आमदार देशमुख व जिल्हाधिकारी आशीर्वाद व मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे व शस्त्रांचे पूजन करून महानाटयाचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी हत्ती व अश्व पूजनही करण्यात आले.

शाहिराने पोवाडा सादर करून १२ व्या शतकातील देवगिरी साम्राज्यावर खिलजी यांनी केलेल्या आक्रमणाची माहिती दिली, तसेच त्या काळातील मराठी मुलखावर होत असलेल्या अन्याय, अत्याचाराची माहिती दिली. खिलजीने देवगिरीचे यादव यांचे साम्राज्य कसे नष्ट केले हे यादव व खिलजी यांच्यातील युध्द प्रसंगातून दाखवण्यात आले. त्यानंतर दख्खनमधील सर्व मुस्लीम सुलतानांनी एकत्रित येऊन राजा हरिहर बुक्क या हिंदू राजाचे साम्राज्य नष्ट केले, महाराष्ट्रातील धार्मिक वातावरण, मराठे सरदार सुलतानासाठी तलवार गाजवत होते, त्यानंतर शहाजी राजे भोसले यांचे कार्य, जिजाऊ माँसाहेब यांचे स्वराज्य स्थापन करण्याचे स्फुलिंग जागृत केले, शिव बालपण, युध्द कला, सवंगड्यांसोबत रायरेश्वरसमोर स्वराज्य स्थापन करण्याची शपथ, पाटील याला दंड, जावळीचे मोरे यांच्याशी युध्द, अफजलखानाचा पन्हाळ गडाच्या पायथ्याशी केलेला वध, शिव पराक्रम पाहून सुलतानशाही बेचैन झाली, पन्हाळ गडाला सिध्दी जोहरचा वेढा, राज्याभिषेक अशा पध्दतीने बाराव्या शतकापासून ते राज्याभिषेकापर्यतचे सादरीकरण महानाट्याच्या माध्यमातून अत्यंत उत्कृष्टपणे करण्यात आले. या महानाट्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून १० हजारापेक्षा अधिक नागरिकांनी हे महानाट्य पाहिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR