19.6 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeपरभणीसातेगाव येथे बाल आनंद नगरी कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सातेगाव येथे बाल आनंद नगरी कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पूर्णा : तालुक्यातील सातेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा आनंद नगरी कार्यक्रमाचे आयोजन दि.२४ जानेवारी रोजी करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी स्वत: पाककृती बनवून आणून शाळेमध्ये व्यापार केला. मुख्याध्यापक मनोज राठोड व सहशिक्षक नागेश आडबलवार यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना एक वेगळ्या ज्ञानाचा परिचय व्हावा या हेतूने आनंद नगरी कार्यक्रम आयोजित केला होता.

या कार्यक्रमात आदित्य ठाकूर यांनी पाणीपुरी, विनायक ठाकूर यांनी कडी वडा, रुपाली ठाकूर यांनी मिरची भजे, समर्थ ठाकूर यांनी इडली वडा, परशुराम ठाकूर यांनी आप्पे चटणी, नंदिनी ढगे यांनी जिलेबी, गोपिका ठाकूर हिने खिचडी पापड, कृष्णा ठाकूर यांनी गुलाब जामुन, अवनी ठाकूर चिवडा पाणीपुरी, प्रज्ञा ढगे हिने भेळपुरी, अस्मिता हिने आईस्क्रीम, माहेश्वरी ठाकूरने कांदा पोहे, वेदिका शिवनखेडे हिने मुरकुल, जानवी शिवन खेडे हिने खोबर लाडू, बंटी सुरेशराव ठाकूर यांनी भाकरवडी, संध्या ठाकूर हिने मुरमुरे चिवडा हे पदार्थ शाळेमध्ये विक्रीसाठी आणले होते.

या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष माणिकराव ठाकूर, उपाध्यक्ष नारायणराव ठाकूर, शिवसेना सर्कल प्रमुख रमेशराव ठाकूर, उपसरपंच काशिनाथ ठाकूर व शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, पोलीस पाटील व तरुण कार्यकर्ते, महिला मंडळीनी आनंदनगरीमध्ये सहभाग नोंदवून खाद्य पदार्थाची खरेदी केली व विद्यार्थ्यांना भरपूर प्रतिसाद दिला. याबद्दल सर्वांचे शिक्षक आडबलवार यांनी आभार व्यक्त केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR