परभणी : समृद्ध विचारांची पेरणी करणारे बालवाचक साहित्य संमेलन वाचनाचा लळा लावून उद्याचे साहित्यिक घडविणारे संमेलन रविवार, दि.२१ रोजी मराठवाडा हायस्कूल परभणी येथे संपन्न झाले. या बालवाचक साहित्य संमेलनाला जिल्हाभरातील बालवाचकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांच्या साहित्य गुणाला या संमेलनामुळे संधी मिळाली. बालवाचकांनी खूप वाचन करावे. निरीक्षण व कल्पनाशक्तीच्या समन्वयातून कविता, गोष्टीची निर्मिती करावी असा संदेश या संमेलनातून मार्गदर्शकांनी दिला.
जिल्ह्यातील ७० ते ८० किलोमीटर हुन बालवाचक पेन, वही, पाणी बॉटल, जेवणाचा डब्बा पुस्तके वाचून नोंदी केलेल्या वह्या घेऊन १० वाजता संमेलन ठिकाणी हजर झाले. रविवार असताना सुद्धा बालवाचक, त्यांना मार्गदर्शन करणारे समन्वयक शिक्षक, पालक, मार्गदर्शक यांनी वेळ काढला. स्वरचित बालवाचक कवींचे संमेलन, कथाकथन, नाटक, गटचर्चा या सर्व सत्रात बालवाचकांनी स्वयंपूर्ण सहभाग नोंदविला.
बालवाचकांच्या साहित्यिक प्रतिभेला बालवाचकांनीच भरभरून दाद दिली. जिल्हास्तरीय फेरीतून निवडलेल्या उत्कृष्ट बालवाचकांचा सन्मान केला. शिक्षणाधिकारी संजय ससाने, प्राचार्य डॉ. विकास सलगर, आनंद पांडे, अरविंद सगर, त्रिंबक वडस्कर यांनी मार्गदर्शन केले. संमेलनाध्यक्षा कु. अनुराधा चव्हाण, उद्घाटक कु. प्रियंका यादव यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक मुख्य प्रवर्तक विनोद शेंडगे यांनी तर आभार जिल्हा समन्वय प्रकाश डुबे व सूत्रसंचालन कवयित्री इंदुमती कदम यांनी केले. संमेलन यशस्वी होण्यासाठी दिपाली महिंद्रकर, रत्नमाला शेळके, सुलोचना गिरी, मंजुषा देशमुख, सुषमा नवले, वैशाली धाबे, माधुरी खंडागळे, श्रीमती स्वामी, मनीषा जोशी, श्रीमती काळे, कैलास सुरवसे, नरहरी मुटकुळे, रविकांत झटे, ईश्वर मोरताळे, अनंता कदम, गजानन कुरे यांनी परिश्रम घेतले.