40.2 C
Latur
Wednesday, April 23, 2025
Homeपरभणीपंढरपूर सायकलवारी सांगता कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पंढरपूर सायकलवारी सांगता कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

परभणी : नुकताच झालेल्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने परभणी येथील प्रभावती डेली रायडर्सच्या वतीने परभणी ते पंढरपूर असा ३५० कि.मी. ची सायकलवारी दि.५ ते ७ जुलै या कालावधीत संपन्न झाली. पंढरपूर येथील सायकल ंिरगण सोहळा पूर्ण करून परभणी शहरात आलेल्या सर्व सायकलिस्टचा सहपरिवार हॉटेल निरज इं टरनॅशनल येथे रविवार, दि.२१ जुलै रोजी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून पंढरपूर वारी सांगता कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात सायकलिस्टचा सहपरीवार सत्कार करण्यात आला. तसेच आयोजित मनोरंजनात्मक, गीतांच्या कार्यक्रमाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे शंकर गुजराती (सीए), श्रीमती संध्या पारख, निरज पारख, प्रभावती रायडर्सचे अध्यक्ष माणिक गरुड यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व सायकलिस्टचा सहपरिवार फुलाचे रोपटे, सन्मानचिन्ह तसेच प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी कल्याण देशमुख, राहुल सिरसेवाड, दिपक तळेकर, शंकर फुटके, डॉ. पवन चांडक या सायकल प्रेमींनि आपले अनुभव व मनोगत व्यक्त केले. या सोबतच सुरुची भोजन आणि मनोरंजन खेळ व सुमधुर गीत गायनाचा कार्क्रम संपन्न झाला. या प्रसंगी श्रीनिवास संगेवार, गिरीश जोशी, बालासाहेब तावरे, संदीप पवार, राजेश्वर वासलवार, नितिन शेवलकर, दिनेश शर्मा, सिद्धांत ओझा, ओमकार भेडसुरकर, माधव मंडगे उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR