मानवत : नगर परिषद प्रशासनाने नियम बा पणे केलेली भाडेवाड व प्रतिष्ठित व्यापा-यांना दिलेल्या अपमानास्पद वागणूकीमुळे मानवत शहर बंद ठेवण्यात आले होते. या बंदला व्यापा-यांनी दुकाने बंद ठेवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बंदमुळे संपूर्ण बाजारपेठेत शुकशुकाट पहायला मिळाला. तसेच भाडेवाढ रद्द न झाल्यास या विरोधात रास्ता रोकोसअ अन्य आंदोलने करण्याचा इशारा व्यापा-यांनी दिला आहे. दरम्यान नियमबा भाडेवाढीच्या विरोधात तहसीलदार यांचे प्रतिनिधी मानवत सज्जाचे तलाठी नागरगोजे यांना निवेदन देण्यात आले.
मानवत शहरातील गाळे धारक व मोकळ्या जागेतील किरायदार यांना नियमबा बेसुमारभाडेवाड केली आहे. यामुळे सर्व व्यापा-यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. नगर परिषद प्रशासनाच्या निषेधार्थ आज सर्व व्यापा-यांनी मानवत बंद करून निषेध नोंदवला. यावरही भाडेवाड रद्द् नाही झाल्यास रास्ता रोको, साखळी उपोषण, मतदानावर बहीष्कार, आमरण उपोषण अंदोलने करण्यात येतील असा इशारा यावेळी देण्यात आला.
तलाठी नागरगोजे यांना दिलेल्या निवेदनावर अनिल जाधव (शिवसेना शहरप्रमुख ठाकरे गट), रामराजे महाडीक ( सीआयआययू जिल्हा सचिव), रवी दहे, दिपक बारहाते (युवासेना), नगरसेवक शाम चव्हाण, अंनत भदर्गे, रहीम भाई, अॅड. विक्रमसिंह दहे, जनार्धन किर्तने, शंकर तर्टे, रवी पंडीत, चंद्रकांत मगर, जयप्रकाश मिटकरी, बंडू तुरे, गब्बर दहे, गणेश कडतन, विष्णू पवार, नारायण शिंदे, सतिष लांडे, प्रल्हाद दहे, सुरेश बनगर, माऊली दहे, शे.सत्तार, सुभाष सावंत, रमेश हाळने, विष्णू वाघमारे, शे.अमिरोद्दीन, विठ्ठल शेळके, प्रभाकर घोडके, रतन शिंदे, दिपक कुमावत, बबन हजारे, भगवान कुंभार, किसन भिसे, पप्पू सावंत, पानझाडे, हाळने, कोकरे आदिसह अनेकांच्या स्वाक्षरी आहेत.