परभणी : संस्कृती विद्यानिकेतन इंग्लीश स्कुलमध्ये क्रीडा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडाधिकारी श्रीमती कविता नावंदे, मनपा क्रीडाधिकारी राजकुमार जाधव, संजय शिंदे यांची उपस्थिती होती.
विद्यार्थीनी समिक्षा घटमळ, नेहा वाघमारे, आयुषी झरकर यांनी स्वागतगीत सादर केले. मान्यवरांच्या हस्ते मशाल प्रज्वलीत करून हिरवा झेंडा दाखवून क्रीडा दिनास सुरूवात केली. रनिंग, संगीत खुर्ची, सॅक रेस, बॉल इन बकेट, लिंबू चमचा, रस्सी खेच अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. पालकांनी सुध्दा संगीत खुर्चीचा आनंद घेतला. शिक्षकांसाठी बलून गेम घेण्यात आला. शाळेच्या संचालिका सरोज देसरडा व प्राचार्य अक्षय देसरडा यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन व कौतूक केले. सुत्रसंचालन शिक्षीका शुभांगी सवंडकर यांनी केले. यशस्वितेसाठी सर्व शिक्षकवृंद व कर्मचा-यांनी परीश्रम घेतले.