पुणे : पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाशी संबंधित एका प्रकरणात पीडित कस्पटे कुटुंबीयांना धमकावल्याप्रकरणी नीलेश चव्हाण नामक तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणावर वैष्णवीचे बाळ घेण्यासाठी गेलेल्या वैष्णवीच्या कुटुंबीयांना धमकावल्याचा आरोप आहे.
निलेश चव्हाण हा वैष्णवी हगवणेचे पती शशांक हगवणे याचा मित्र आहे. त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची आहे. त्याच्यावर त्याच्या पत्नीचा अमानुष छळ केल्याचा ठपका आहे. तो स्पाय कॅमे-याच्या मदतीने आपल्या पत्नीचे आक्षेपार्ह व्हीडीओ चित्रित करायचा. या प्रकरणी त्याच्यावर २०१९ म्ध्ये पुण्यातील वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याच ठाण्यात नीलेश चव्हाणवर वैष्णवी हगवणेचे बाळ मागण्यासाठी गेलेल्या तिच्या माहेरच्यांना पिस्तुल दाखवून धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.