सोलापूर,- शुक्रवार पेठेतील कै. रामचंद्रप्पा शेटे यांच्या वाड्यात ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या योगदंडाचे पूजन गुरुवारी भक्तिमय व मंगलमय वातावरणात करण्यात आले. शेटे वाड्याने गेल्या 900 वर्षापासून ही परंपरा मोठ्या श्रद्धेने व भक्तीभावाने जोपासली असून येथील योगदंड पूजनाने यात्रेतील धार्मिक विधीचा श्री गणेशा झाला.
यात्रेपूर्वी शेटेवड्यात श्री सिद्ध रामेश्वरांच्या योगदडाचेचे विधिवत पूजन करण्याची परंपरा चालत आली आहे. यावेळी शेटे वाडा हा फुलांनी सजविण्यात आला होता. परंपरेनुसार गुरुवारी दुपारी बारा वाजता मानकरी हिरे हब्बु यांच्या वाड्यातून शिवशंकर कंटीकर हे योगदंड घेऊन काही कै. शेटे यांच्या वाड्यात दाखल झाले. त्या पाठोपाठ मानकरी हिरेहब्बु मंडळीचे आगमन झाले. त्यानंतर योगदंडाच्या विधिवत पुजेला सुरुवात झाली.
कै. शेटे यांचे वारस एड. मिलिंद थोबडे यांचे चिरंजीव ऍड रितेश थोबडे यांनी फुलांनी सजवलेल्या चौरंगावर योगदंड विराजमान करून विभूती, गंध, फुले, अर्पण केली. संबळ वाद्याच्या निनादात व भक्तीमय वातावरणात त्यांनी योगदंडाची विधिवत पूजा केली. त्यानंतर बोला बोला एकदा भक्त लिंग हर्र बोला हरर…श्री सिद्धेश्वर महाराज की जय असा जयजयकार करण्यात आला. यावेळी विजयाताई थोबडे, अँड मिलिंद थोबडे, सुचिता थोबडे, ललिता थोबडे , श्रद्धा थोबडे, प्रणिता थोबडे, सुधीर थोबडे, विक्रांत थोबडे, गीता थोबडे प्रतीक थोबडे, संकेत थोबाडे, सिधेश थोबाडे, राजश्री देसाई उमेश अक्कलवाडे आदींनी योगदंडाचे दर्शन घेतले त्यानंतर नैवेद्य दाखवण्यात आले. नंदीध्वजाचे मानकरी सागर हिरेहब्बू ,मनोज हिरेहब्बू ,अमित हब्बू, आकाश हब्बू, सिद्धेश हब्बु यांची ॲड. रितेश यांनी पाद्यपूजा केली व पूजानंतर उपस्थितांना महाप्रसाद देण्यात आला.
श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेस आज पासून प्रारंभ झाला आहे. शेटे घराण्यामध्ये योगदंडाच्या पूजेने सुरुवात केली जाते. मानकरी हिरेहब्बु व हब्बु यांच्या उपस्थितीमध्ये योगदंडाची पूजा करून या महायात्रेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. सिद्धरामेश्वराच्या कृपेने ही यात्रा निर्वीघ्न पार पडावी. असे ऍड मिलिंद थोबडे यांनी सांगीतले.