दुबई : आशिया कप २०२५ स्पर्धेतील ११ व्या सामन्यात अनुभवी ऑलराउंडर मोहम्मद नबी याने केलेल्या स्फोटक आणि अर्धशतकी खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानने करो या मरो सामन्यात श्रीलंकेसमोर १७० धावांचे आव्हान ठेवले आहे. मोहम्मद नबी याने २० व्या ओव्हरमधील पहिल्या ५ बॉलमध्ये सलग ५ सिक्स लगावत सामन्याचा चेहरामोहरा बदलाला.
नबीने सलग ५ सिक्ससह श्रीलंकेच्या बाजूने झुकलेला सामना आपल्या बाजूने फिरवला. नबीने ५ सलग सिक्ससह अर्धशतक पूर्ण केले. मात्र नबी दुनिथ वेलालागे याने टाकलेल्या २० व्या ओव्हरमधील सहाव्या आणि शेवटच्या बॉलवर सलग सहावा सिक्स लगावण्यात अपयशी ठरला. नबी दुसरी धाव घेताना स्ट्राईक एंडवर रन आऊट झाला. मात्र नबीने त्याची भूमिका चोखपणे पार पाडली. नबीने शेवटच्या ओव्हरमध्ये केलेल्या ३१ धावांमुळे अफगाणिस्तानला ८ विकेट्सने गमावून १६९ पर्यंत मजल मारता आली. नबीने ६ सिक्स आणि ३ फोरसह २२ बॉलमध्ये ६० रन्स केल्या.