22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeसोलापूरश्री विठ्ठल मंदिर सातशे वर्षांपूर्वीच्या मूळ रूपात

श्री विठ्ठल मंदिर सातशे वर्षांपूर्वीच्या मूळ रूपात

पंढरपूर /प्रतिनिधी

श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे मंदिर संवर्धन कामामुळे १५ मार्चपासून चरण दर्शन बंद करून मुखदर्शन ठेवण्यात आले होते. आता मंदिर संवर्धनाचे काम अंतिम टप्प्यात आले असून श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचा गाभारा चौखांबी आणि सोळखांबी येथील कामे पूर्ण होत आल्याने मंदिरातील दगडावर लावण्यात आलेली चांदी याचबरोबर अनावश्यक असलेले बांधकाम काढल्याने विठुरायाचे मंदिर ७०० वर्षापूर्वी होते, तसेच विठ्ठल मंदिर काळ््या बेसाल्ट पाषाणात खुलून दिसू लागले आहे. भाविकांना २ जूनपासून चरण दर्शन घेता येणार असून मंदिराचे जुने रूप पाहावयास मिळणार आहे .

यासाठी मंदिर समितीने सर्व व्यवस्था पूर्ण केली आहे. या सोहळ््यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंदिर समिती सदस्य, मंदिर सल्लागार समिती सदस्य, जिल्हाधिकारी आणि सर्व प्रमुख फडक-यांना निमंत्रित केले आहे. सध्या आचारसंहिता सुरू असल्याने जरी पालकमंत्री अथवा मंदिर समिती अध्यक्ष उपस्थित नसले तरी विठुरायाची सकाळची नित्यपूजा मंदिर समितीच्या पुजा-यांच्याच हस्ते केली जाणार आहे. सध्या विठ्ठल सभामंडपाचे काम सुरु असून हे पूर्ण होण्यास ३० जून उजाडणार असल्याने आता देवाच्या मुखदर्शनाच्या व्यवस्था पर्यायी मार्गाने करण्याचे नियोजन समितीने केले आहे.

विठ्ठलाचे चरणस्पर्श दर्शन १५ मार्चपासून दीड महिन्यांसाठी बंद होते. विठ्ठलाच्या मंदिर गाभा-याचे काम करण्यासाठी मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला होता. या काळात रोज सकाळी ५ ते ११ वाजेपर्यंत फक्त मुखदर्शन सुरू ठेवण्यात आले होते. त्यामुळे १५ मार्चपासून देवाचे पायावरील दर्शन पुढील किमान दीड महिन्यासाठी पूर्णपणे बंद करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले होते. दरम्यान आता पुन्हा एकदा विठ्ठलाचे दर्शन सुरू होणार असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

संवर्धनाची बरीच कामे पूर्ण
विठ्ठल मंदिराला मूळ रूप देण्याच्या कामांपैकी गाभारा, चौखांबी, सोळखांबी, बाजीराव पडसाळी वगैरे भागाची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे २ जूनपासून भाविकांना विठुरायाचे मूळ दगडी गाभा-यात तर दर्शन घेता येणार आहेच. शिवाय विठ्ठल मंदिराचे ७०० वर्षापूर्वीचे हे पुरातन रूपदेखील पाहता येणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR