वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय-अमेरिकन उद्योजक आणि लेखक श्रीराम कृष्णन यांना व्हाईट हाऊस कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी (एआय) वरिष्ठ धोरण सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे.
ट्रम्प यांनी रविवारी एका निवेदनात म्हटले आहे की, श्रीराम कृष्णन व्हाईट हाऊसच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान धोरण कार्यालयात कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी वरिष्ठ धोरण सल्लागार म्हणून काम करतील. व्हाईट हाऊस एआय आणि क्रिप्टो झार डेव्हिड ओ मध्ये सामील होणा-या विलक्षण संघाची घोषणा करताना मला आनंद होत आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, श्रीराम कृष्णन हे एआयमधील अमेरिकेचे नेतृत्व सुनिश्चित करण्यावर लक्ष केंद्रित करतील. संपूर्ण सरकारमधील एआय धोरणाला आकार आणि समन्वय साधण्यास मदत करतील. एकत्रितपणे आपण वैज्ञानिक प्रगतीचे लक्ष्य साध्य करू. अमेरिकेचे तांत्रिक वर्चस्व सुनिश्चित करेल. हे अमेरिकन नवनिर्मितीच्या सुवर्णयुगाचीही सुरुवात करेल, असा विश्वास व्यक्त करत. मायकल जे.के. क्रॅटसिओस व्हाईट हाऊस ऑफिस ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी पॉलिसीचे नवीन संचालक असतील. ते विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी राष्ट्राध्यक्षांचे सहाय्यक असतील.
देशाची सेवा करण्यात सन्मान : डॉ. श्रीराम कृष्णन
कृष्णन यांनी त्यांच्या नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. माझ्या देशाची सेवा करण्यात आणि अक मध्ये सतत अमेरिकन नेतृत्व सुनिश्चित करण्यासाठी डेव्हिड सॅक्स सोबत काम करण्यास सक्षम असल्याचा मला सन्मान वाटतो असे त्यांनी वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.