28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रएसटीला ‘अच्छे दिन’ येणार

एसटीला ‘अच्छे दिन’ येणार

तोट्यात असलेले एसटी महामंडळ आता नफ्याच्या उंबरठ्यावर

मुंबई : ‘गाव तेथे एसटी’ असे ब्रीद कायम ठेवताना गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक अडचणींना एसटी महामंडळाला सामोरे जावे लागत होते. १९९० नंतर अनेक वर्षांत एसटीसमोर आर्थिक अडचणी कायम आहेत. मागील वर्षभरापासून तब्बल ९००० कोटी रुपये एसटी महामंडळ संचित तोट्यात आहे. त्यात आता एसटी महामंडळाचा मासिक आणि दैनंदिन हा तोटा अगदी काही कोटी रुपयांवर आला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षात एसटी महामंडळ फायद्यात येण्याची शक्यता आहे.

एसटी बस ही महाराष्ट्रातील प्रत्येक गावाची जीवनवाहिनी झाली आहे. आपल्याला गाव खेड्यापर्यंत पोहोचवणारी लाल परी म्हणजे राज्य परिवहन महामंडळाची बस. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एस.टी. बस हे गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोप-यामध्ये वाहतुकीची सेवा देते. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये आलेल्या संकटांमुळे एसटी ही तोट्यात होती. त्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात तब्बल सहा महिने एसटी महामंडळातील कर्मचारी संपावर होते. त्यानंतर एसटी महामंडळाला तब्बल ९००० कोटी रुपयांचा आतापर्यंत संचित तोटा झाल्याची बाब समोर आली होती. त्यामुळे लालपरीचे पुढे काय होणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र तीच एसटी आता तोट्याच्या उंबरठ्यावरून नफ्याच्या उंबरठ्यावर आहे.

वर्षभरापूर्वी एसटी महामंडळाचा चार हजार कोटी रुपये एकीकडे तोटा असताना, दुसरीकडे गाड्या चालवण्यासाठी डिझेलसाठी पैसा देखील उपलब्ध नसल्याची बाब समोर आली होती. तत्कालीन सरकारने महिना ३०० कोटी रुपये देण्याची सरकारने कबुली दिली होती. मात्र ती देखील रक्कम वेळेत न मिळाल्याने तोटा दिवसेंदिवस वाढत चालला होता. मात्र एसटी महामंडळाने गेल्या वर्षभरात विविध योजना राबवून लालपरीला आणि त्यांच्या प्रवाशांना आनंदाची बातमी दिली. हजारो कोटी रुपये तोट्यात असलेली एसटी आता नफ्याच्या उंबरठ्यावर आहे.

लालपरीची परिस्थिती बदलली !
गेल्या वर्षभरापूर्वी एसटी महामंडळ साधारण साडेतीन कोटी रुपयांत दिवसाला तोट्यात असायचे मात्र आता दिवसाला गेल्या वर्षीच्या तुलनेत तोटा फक्त लाखामध्येच आहे. वर्षभरापूर्वी ९० ते १०० कोटी रुपये महिन्याला एसटी महामंडळाला तोटा असायचा मात्र आता २६ कोटी ३३ लाखांवर आहे. वर्षभरापूर्वी अंदाजे ७५३ कोटी रुपये वार्षिक उत्पन्न होते. तर आता हे उत्पन्न अंदाजे साधारण 900 कोटी रुपयांपर्यंत आहे . पूर्वी एसटी महामंडळाचा खर्च हा ७७९ कोटी रुपयांवर होता. आता एसटी महामंडळाचा अंदाजे खर्च हा सव्वा नऊशे कोटी रुपये आह.े संपानंतर कर्मचा-यांसाठी लागणा-या पगारासाठी ३५० कोटी रुपये एसटी महामंडळाला कमी पडत होते, यासाठी राज्य सरकारकडून मदत करण्यात येते. एसटी नफ्याच्या उंबरठ्यावर येत असल्याने राज्य सरकारवरील हा आर्थिक ताण कमी होणार आहे.सरकार आणि प्रशासनाने मिळून एसटीमधून प्रवास करणा-या प्रवाशांच्या सवलती आणि विविध योजना वाढवल्यानंतर तूट कमी होण्यास सुरुवात झाल्याचे तज्ज्ञ सांगतात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR