16.2 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रसोमवारपासून एसटीचा संप?

सोमवारपासून एसटीचा संप?

मुंबई : ऐन दिवाळीत एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वातील एसटी कष्टकरी जनसंघ या एसटी कामगार संघटनेने सोमवार, ६ नोव्हेंबरपासून संपाची हाक दिली आहे. या संपात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी-कामगार सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे एसटी प्रवाशांसह एसटी महामंडळालाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

जवळपास दोन वर्षांपूर्वी एसटी महामंडळाचे विलिनीकरण, सातवा वेतन आयोग, आदींसह विविध मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला होता. एसटी कर्मचाऱ्यांच्या या उत्सुर्फ संपात गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेतली. या संपानंतर एसटी कर्मचाऱ्यांची संघटना त्यांनी सुरू केली. आता, सदावर्ते यांनी एसटी संपाची हाक दिली आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले की, एसटी महामंडळाच्या ताफ्यात ८५ टक्के नादुरुस्त बसेस धावत आहे. सातवा वेतन आयोग आणि इतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला असल्याचे सदावर्ते यांनी सांगितले. या संपात ६८ हजार कर्मचारी सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ऐन दिवाळीत संपाचा एसटीला फटका?
मागील काही महिन्यापासून एसटी महामंडळाकडे प्रवाशांचा ओढा वाढला आहे. त्याच्या परिणामी एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होत आहे. दिवाळीच्या निमित्ताने आपल्या गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाकडून जादा वाहतूक चालवली जाते. त्यामुळे गणेशोत्सवानंतर दिवाळीच्या हंगामात एसटीच्या महसुलात वाढ होत असते. अशातच एसटीच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा दिवाळीत संप पुकारल्यास एसटी महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR