35.1 C
Latur
Friday, May 24, 2024
Homeराष्ट्रीयमोदींच्या रोड शोदरम्यान स्टेज कोसळले; १० जणांपेक्षा अधिक जखमी

मोदींच्या रोड शोदरम्यान स्टेज कोसळले; १० जणांपेक्षा अधिक जखमी

जबलपूर : मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोदरम्यान अपघात घडला आहे. रस्त्याच्या कडेला स्वागतासाठी उभे केलेले स्टेज कोसळल्याने दहापेक्षा जास्त लोक जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. जखमींमध्ये महिला, पत्रकार आणि लहान मुलांचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जबलपूर येथे रोड शो केला. या कार्यक्रमासाठी हजारो लोक रस्त्यावर उतरले होते. गर्दीमध्ये रस्त्यावरील एक स्टेज कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये कुणालाही गंभीर इजा झालेली नाही. पंतप्रधानांची एक झलक पाहण्यासाठी गरजेपेक्षा जास्त लोक स्टेजवर चढले होते. पोलिसांनी सांगूनही लोकांनी ऐकले नाही. त्यामळे स्टेज कोसळले आणि लोक जखमी झाले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जबलपूरमध्ये झालेल्या रोड शोचे फोटो आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर केले आहेत. ते म्हणतात, आज जबलपूरमध्ये रोड शो संपन्न झाला. येथील माझ्या कुटुंबियांचा उत्साह आणि जल्लोष पाहून माझ्या तिस-या टर्मला आशीर्वाद मिळतील, हे निश्चित आहे. इन्फ्रास्ट्रक्चर आणि रस्त्यांसह येथे आम्ही काम उभे केले आहे. त्यामुळे जबलपूरच्या विकासाला चालना मिळाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR