वणी : श्री सप्तशृंगी गडावर चैत्र नवरात्रीचा उत्सव जल्लोषात सुरू असून चैत्र नवरात्री उत्सवानिमित्ताने बुधवारपासून भाविकांची अलोट गर्दी आहे. दरम्यान मोठ्या प्रमाणात दाखल झालेल्या भाविकांमुळे मंदीर परिसरात चेंगराचेंगरी झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान मंदीर प्रशासनाकडून सदर घटनेला दुजोरा देण्यात आला नसला तरी एक व्हीडीओ व्हायरल झाला आहे.
सप्तशृंगी मातेचे मंदीर उत्सव काळात भाविकांसाठी २४ तास दर्शनासाठी खुले ठेवण्याचा निर्णय मंदीर प्रशासनाकडून घेण्यात आला आहे असे असतानाही सप्तशृंगी गडावर भाविकांची तुफान गर्दी असल्याचे पाहायला मिळत आहे. दहा लाख भाविक यात्रेसाठी गडावर येण्याचा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला होता. त्याप्रमाणेच भाविकांनी अलोट गर्दी चैत्र पौर्णिमा यात्रा निमित्त गडावर सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी झाली आहे.
सध्या सप्तशृंगी गडावर भाविकांचा जनसागर लोटला असल्याचे त्यात पाहायला मिळत आहे. सप्तश्रृंगी मातेच्या दर्शनासाठी केवळ नाशिक जिल्ह्यातीलच भाविक नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातील भाविक देखील या यात्रेसाठी गडावर येत असतात. मात्र भाविकांची अचानक अलोट गर्दी झाल्याने दर्शनासाठी आलेल्यांमध्ये ढकलाढकली झाल्याचे पाहायला मिळत आहे. यानंतर भाविकांना काळजी घेण्याचे आवाहन मंदीर प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात