डार्विन : येथील मरारा क्रिकेट ग्राउंडवर बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटीच्या दुस-या दिवशी मिचेल स्टार्कने शादमान इस्लामला बाद करून आपला ४३४ वा कसोटी बळी घेतला. यासह, तो कसोटीत सर्वाधिक बळी घेणारा डावखुरा गोलंदाज बनला. स्टार्कने श्रीलंकेच्या रंगना हेराथच्या ४३३ बळींचा विक्रम मागे टाकला.
दुसरीकडे, बांगलादेशने आपल्या पहिल्या डावात १३० धावा केल्या आहेत. यापूर्वी ऑस्ट्रेलिया १९८ धावांवर सर्वबाद झाली होती. कसोटीत बांगलादेशविरुद्ध ऑस्ट्रेलियाची ही सर्वात कमी धावसंख्या आहे. ४३४ बळींसह स्टार्कने भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या कसोटी बळींचीही बरोबरी केली. कपिलने १३१ कसोटीत ४३४ बळी घेतले होते, तर स्टार्कने हा आकडा १०६ कसोटीत गाठला. आता स्टार्क कसोटीत सर्वाधिक बळी घेणा-या गोलंदाजांच्या यादीत संयुक्तपणे ११व्या स्थानावर आहे. त्याच्या पुढे ४३९ बळींसह दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन आहे.
















