22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeसोलापूरप्री मॅट्रीक शिष्यवृत्ती सुरु करा

प्री मॅट्रीक शिष्यवृत्ती सुरु करा

सोलापुर : अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना देण्यात येणारी प्री मॅट्रीक शिष्यवृत्ती पुन्हा सुरु करण्याची मागणी आ. डॉ. वजाहत मिर्झा (चेरअमन, वक्फ बोर्ड, महाराष्ट्र राज्य तथा अध्यक्ष -महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग ) यांच्याकडे केल्याची माहिती अखिल भारतीय उर्दु शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अ.गफुर अरब यांनी दिली.अल्पसंख्यांक विकास मंत्रालयात भारत सरकार यांच्याद्वारे प्रि मॅट्रिक शिष्यवृत्ती इ 1 ली ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना देण्यात येत होती.

सदरच्या विद्यार्थ्यांना दरमहा 100/-रुपये प्रमाणे शिष्यवृत्ती मंजूर असताना अचानक पणे नवीन व नूतनिकरण चे मिळून जवळपास 12 लाख विद्यार्थ्यांचे अर्ज रद्द करण्यात आले, तरी सदरची प्रि मॅट्रिक शिष्यवृत्ती पूर्वी प्रमाणे चालू राहण्यासंदर्भारत सविस्तर चर्चा करण्यात आली व त्याच बरोबर महाराष्ट्रातील मानसेवी शिक्षकांची विविध मागण्याचे निवेदन आले. यामध्ये तात्काळ 180 विद्यार्थी साठी 1 मानसेवी शिक्षकाची नियुक्ती ही जाचक अट रद्द करणे, व मानधन वाढ करणे /मानसेवी शिक्षकांना कायम करणे, मराठी भाषा फाउंडेशन योजना 5ते 10 पर्यंत राबविण्यात येणे इत्यादी मागण्यावर निर्णय घेण्यासंदर्भात येणाऱ्या अधिवेशनात तारांकित प्रश्नामध्ये समाविष्ट करून सकारात्मक चर्चा करून तोडगा काढू असे सांगितले. यावेळी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेच जिल्हा कार्याध्यक्ष – जुबेर मुजावर ,जिल्हा सचिव :- माजिद कलादगी, नुसरत मुल्ला , रामेश्वरी विठूबोने , समिना बिजली, नाझनीन शेख आदी शिक्षक उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR