परभणी : मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकूल येथे राज्यस्तरीय भव्य लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे सज्जु लाला मित्रमंडळ, आकाश लहाणे भैय्या मित्रमंडळ, अक्षय भैय्या मित्रमंडळ, नईम भाई मित्रमंडळ, विश्वजीत बुधवंत मित्रमंडळ, भीमराव वायवळ मित्रमंडळ, शिवतेज मित्रमंडळाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन प्रथम महापौर प्रताप देशमुख यांच्या हस्ते झाले.
यावेळी शंकर भागवत, राजेश देशमुख, श्रीकांत विटेकर, आकाश लहाणे, विजय धरणे, किरण तळेकर, सचिन पाचपुंजे, रोहन सामाले, सुदर्शन काळे, दिपक वारकरी, समीर पोलार्ड, रितेश देशमुख, विक्रम बांगर, नारायण गीते, सुनिल गोळेगावकर, अक्षय जगताप, श्रीकांत शिंदे, श्रीकांत खटींग, वैभव वडकर, विकी डुबे, सय्यद मुश्ताक, योगेश तुरे यांची उपस्थिती होती. स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषीके देण्यात येणार आहेत.