22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeसोलापूररविवारी राज्यस्तरीय लिंगायत वधू-वर पालक मेळावा

रविवारी राज्यस्तरीय लिंगायत वधू-वर पालक मेळावा

सोलापूर : महात्मा बसवेश्वर वधू वर सूचक केंद्र कुपवाड सांगली व महात्मा बसवेश्वर ब्लड बँकेच्या राष्ट्रीय लिंगायत महामंच भारत यांच्या सहकार्याने रविवार दि. ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात राज्यस्तरीय लिंगायत धर्मातील सर्व पोटजातीतील वधू – वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती स्वागताध्यक्ष तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून रेवनसिद्ध जवळेकर,अप्पासाहेब शेगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या मेळाव्याचे उद्घाटन शिवयोगी मठाचे प्रमुख प. पू. बसवलिंग महास्वामी, प. पू. स्वाम ीनाथ महास्वामी, बसव केंद्राचे प्रमुख सिंधूताई काडादी, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांच्या हस्ते व सोलापूर महानगरपालिकेचे माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

अखिल भारतीय माळी समाज संघाचे अध्यक्ष शंकरराव लिंगे, सकलेश बाभुळगावकर, चन्नवीर भद्रेश्वरमठ, आनंद मुस्तारे, प्रशांत कोरे, प्रा. राजाराम पाटील, गणेश चिंचोळे, मल्लिकार्जुन मुलगे, शिवानंद गोगाव, सचिन तुगावे, रेवनसिद्ध बिजरगी, राजश्री थळंगे, सचिन शिवशक्ती, नामदेव फुलारी, तुकाराम माळी, चंद्रकांत पाटील आदींसह जिल्ह्यातील लिंगायत समाजातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या राज्यस्तरीय मेळाव्यास लिंगायत धर्मातील सर्व पोटजातीतील लिंगायत, वाणी, म ह्याळी, कुंभार, तेली, गवळी, जंगम, शीलवंत, दीक्षावंत, कोष्टी, पंचम, कोष्टी आदी सर्व पोटजातीतील पालक वधू-वर पालक परिचय उपस्थित राहणार आहेत. या वधू- वर पालक परिचय मेळाव्यास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शेगावे यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेत विजयकुमार हत्तुरे, चंद्रकांत पाटील, सकलेश बाभुळगावकर आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR