26.6 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्र२७ ऑगस्टला कृषि व्यापा-यांचा राज्यव्यापी बंद

२७ ऑगस्टला कृषि व्यापा-यांचा राज्यव्यापी बंद

पुणे : प्रतिनिधी
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रिज अँड अ‍ॅग्रिकल्चर (मुंबई), फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई), चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज अँड ट्रेड (मुंबई), दी ग्रेन, राईस अँड ऑईल सीडस् मर्चंटस् असोसिएशन व दी पूना मर्चंटस् चेंबर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य व्यापारी कृति समितीतर्फे या परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी सर्वांच्या सहमतीने ठराव करून २७ ऑगस्टला व्यापा-यांच्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी व्यापार बंदचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, अन्नधान्याला जीएसटी लागू झालेला असल्यामुळे कृषि उत्पन्न बाजार समिती नियमन (सेस) रद्द करा, जी.एस.टी. कायदा सुटसुटीत करावा, दरमहा रिटर्नची संख्या कमी करावी, तसेच, खरेदीवरील सेटऑफ संबंधी मागील अनेक अडचणी दूर कराव्यात, अशा व्यापा-यांच्या अनेक प्रश्नांविषयी रविवारी दी पूना मर्चंटस् चेंबर, पुणे येथे राज्यव्यापी परिषदेचे आयोजन करण्यात आले.

यावेळी व्यापा-यांनी आपल्या भावना व्यक्त करत कृषि उत्पन्न बाजार समित्या भ्रष्टाचाराचा अड्डा बनत असल्याचा आरोपही केला. या परिषदेसाठी महाराष्ट्रातील मुंबई, नवी मुंबई, उल्हासनगर, नाशिक, जळगाव, भुसावळ, जुन्नर, नारायणगाव, चाकण, बारामती, अहमदनगर, बार्शी, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, कराड, सातारा इ. ठिकाणांहून १५० व्यापारी पदाधिकारी व चेंबरचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थिती होते, या परिषदेचे अध्यक्षस्थान ललित गांधी यांनी भूषविले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR