22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeपरभणीमराठवाड्याचा मागासलेपणा दूर करण्यासाठी महाविकास आघाडीच्या मागे राहा

मराठवाड्याचा मागासलेपणा दूर करण्यासाठी महाविकास आघाडीच्या मागे राहा

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांचे आवाहन

परभणी : राज्यातील उद्योग गुजरात गेलेले आहेत. राज्यातील सरकार महाराष्ट्रासाठी की गुजरातसाठी असा प्रश्न उपस्थित होत असून मराठवाड्यात मागील काळात एकही उद्योग आलेला नसल्याने बेरोजगार तरूणांच्या हाताला काम कसे मिळेल. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आल्यावर मराठवाड्यात उद्योग येण्यासाठी आपण प्रयत्न करून मराठवाड्यातील मागासलेपणा दूर करण्यासाठी महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे अवाहन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले.

पाथरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार सुरेशराव वरपुडकर यांच्या प्रचारार्थ सोनपेठ येथील आठवडी बाजार मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उमेदवार आ. सुरेशराव वरपुडकर, खा. संजय जाधव, माजी खा. तुकाराम रेंगे पाटील, बाळासाहेब देशमुख, पंजाबराव देशमुख, रामभाऊ घाडगे, माजी आ. व्यंकटराव कदम, प्रेरणाताई वरपूडकर, मुंजाभाऊ धोंडगे, माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय कदम, धोंडीराम चव्हाण, भगवानराव वाघमारे, माजी नगरसेवक प्रभाकर सिरसाठ, जगन्नाथ कोलते, समशेर वरपूडकर आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्यातील महायुतीकडून पक्ष फोडणे, आमदार फोडणे या गोष्टी सर्वसामान्याना न पटणा-या आहेत. लोकशाही जीवंत ठेवायची असेल तर अशा विचारापासून दुर राहीले पाहीजे. तुमच्यासाठी लढणा-या माणसाच्या पाठीशी उभे राहायचे का, पिळवणूक करणा-या मागे राहायचे याचा विचार करण्याची वेळ आली असल्याचे ते म्हणाले. पुढे ते म्हणाले की, पाथरी मतदार संघातील सामान्य गोरगरीबांच्या विकासासाठी आलेल्या पैशावर कोणी डल्ला मारला हे विसरता येणार नसल्याचा टोला त्यांनी यावेळी मारला.

राज्यात सध्या महापुरूषांची बदनामी, अवहेलना व अवमान करणा-यांवर कडक कारवाई व्हावी यासाठी महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर कठोर कायदा केला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त करत अल्पसंख्याक समाजाबाबत भाजपने अनेक वक्तव्ये केली असून त्याच्या निषेध आम्ही यापुर्वीच केला आणि आजही करत आहोत. महाराष्ट्राची व मराठवाड्याची ही संस्कृती नाही अशी वक्तव्य कधीही खपवुन घेतली जाणार नसल्याचे देशमुख म्हणाले. यावेळी प्रास्ताविक तालुकाध्यक्ष मुंजाभाऊ धोंडगे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रा. तय्यब सय्यद यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR