28 C
Latur
Saturday, February 1, 2025
Homeराष्ट्रीयशेअर बाजार ‘फ्लॅट’ स्थितीत बंद

शेअर बाजार ‘फ्लॅट’ स्थितीत बंद

सेन्सेक्स ५ अंकांनी वाढला तर निफ्टी २६ अंकांनी घसरला

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज म्हणजेच १ फेब्रुवारी रोजी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. यानंतर, सेन्सेक्स ५ अंकांच्या वाढीसह ७७,५०५ वर बंद झाला. निफ्टी २६ अंकांनी घसरून २३,४८२ वर बंद झाला. त्याच वेळी, बीएससी मिडकॅप २१२ अंकांच्या घसरणीसह ४२,८८४ वर बंद झाला.

सेन्सेक्सच्या ३० पैकी १६ शेअर्स वधारले तर १४ शेअर्स कोसळले. निफ्टीच्या ५० पैकी २९ शेअर्समध्ये घसरण झाली तर २२ शेअर्समध्ये वाढ झाली. एनएसई क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये, रिअल्टी क्षेत्राने सर्वाधिक ३.३८ % वाढ नोंदवली. परकीय गुंतवणूकदारांनी बजेटच्या एक दिवस आधी १,१८८.९९ किमतीचे शेअर्स विकले. एनएसई डेटानुसार, ३१ जानेवारी रोजी विदेशी गुंतवणूकदारांनी १,१८८.९९ कोटी रुपयांचे समभाग विकले. या कालावधीत देशांतर्गत गुंतवणूकदारांनी २,२३२.२२ कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले.

३१ जानेवारी रोजी अमेरिकेचा डाऊ जोन्स ०.७५% च्या घसरणीसह ४४,५४४ वर बंद झाला. एस अ‍ॅन्ड पी ५०० निर्देशांक ०.५०% घसरून ६,०४० वर आला. नासदाक निर्देशांक ०.२८% घसरला. गेल्या बजेटमध्ये बाजार १२७८ अंकांनी घसरला होता, पण नंतर रिकव्हरी आली होती. गेल्या वर्षी जुलैमध्ये सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात सरकारने अल्पकालीन आणि दीर्घकालीन भांडवली लाभ करात वाढ केली होती. यानंतर व्यवहारादरम्यान सेन्सेक्स १,२७८ अंकांनी घसरला आणि ७९,२२४ वर पोहोचला. तथापि, नंतर पुनर्प्राप्ती झाली. तो ७३ अंकांच्या घसरणीसह ८०,४२९ च्या पातळीवर बंद झाला.

भाषण सुरू असताना ४३५ अंकांची घसरण
अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान निफ्टी ४३५ अंकांनी घसरून २४,०७४ वर आला. बाजार बंद होण्याआधी, तो देखील सावरला होता आणि ३० अंकांच्या घसरणीसह २४,४७९ च्या पातळीवर बंद झाला होता. निफ्टीच्या ५० समभागांपैकी २० वर तर २९ समभाग खाली आले. एकातही बदल झाला नाही.

बजेटमुळे शनिवारी बाजार सुरू
केंद्रीय अर्थसंकल्पामुळे शनिवार असूनही बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) खुले आहेत. दोन्ही एक्सचेंज सामान्य व्यापार दिवसांप्रमाणे सकाळी ९:१५ ते दुपारी ३:३० पर्यंत उघडे राहतील. सामान्यत: शेअर बाजार शनिवार आणि रविवारी बंद असतात. १ फेब्रुवारी २०२० रोजीही, बजेटचा दिवस शनिवार होता, त्यामुळे बाजार उघडला गेला. २८ फेब्रुवारी २०१५ रोजीही अर्थसंकल्पाचा दिवस शनिवार असल्याने बाजार उघडला होता.

काल बाजारात ७४० अंकांची वाढ
काल म्हणजेच ३१ जानेवारीला सेन्सेक्स ७४० अंकांच्या वाढीसह ७७,५०० वर बंद झाला. निफ्टीही २५८ अंकांनी वधारला आणि २३,५०८ वर बंद झाला. सेन्सेक्समधील ३० समभागांपैकी २५ वाढले आणि ६ घसरले. निफ्टीच्या ५० समभागांपैकी ४४ समभागात वाढ तर ७ समभागात घसरण झाली. ठरए क्षेत्रीय निर्देशांकात, ग्राहक टिकाऊ वस्तू क्षेत्राने सर्वाधिक २.४४% वाढ केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR