सोलापूर : मावा विक्री प्रकरणावरून वडार गल्ली आणि बाबा कादरी मशिद या दोन गटात वाद होऊन दगडफेक झाली. अचानक सुरू झालेल्या दगडफेकीमुळे लोकांची पळापळ झाली.
दरम्यान, पोलिस वेळीच पोहोचल्याने परिस्थिती नियंत्रणात आहे. परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. या घटनेत दोन्ही गटाकडून गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. घटनास्थळावर शहर पोलिस दलाचे पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी दाखल झाले असून घटनेतील लोकांचा शोध पोलिस घेत आहेत. सध्या या भागातील रस्ता बंद करण्यात आला असून पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले.