28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeछत्रपती संभाजीनगरभुजबळांना आवरा, ते महाराष्ट्र पेटवतायेत

भुजबळांना आवरा, ते महाराष्ट्र पेटवतायेत

ओबीसी नेते विरोधात उभे केले, जरांगेंचा हल्लाबोल

बीड : मराठ्यांना आरक्षण देण्यास कोणत्याही राजकारण्याची ठाम भूमिका नसल्याचे वक्तव्य मनोज जरांगे यांनी केले. मंत्री छगन भुजबळ हेच दंगली घडवणार आहेत. त्यांना आवरा, समाजाचा प्रश्नाचे यांना गांभीर्य नाही का? असा सवाल जरांगे यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये छगन भुजबळ आहेत. ते जातीयवाद करत असल्याचेही मनोज जरांगे म्हणाले. ओबीसीचे सगळे नेते माझ्या विरोधात उभे करण्याचे काम छगन भुजबळ यांनी केल्याचे जरांगे म्हणाले.

राज्यात मराठा ओबीसी हा वाद कधीच होणार नाही. छगन भुजबळ हे महाराष्ट्र पेटवायला निघाले आहेत. छगन भुजबळांना सरकारने बळ दिले आहे. त्यांना सरकामध्ये घेऊन मंत्रीपद दिले आहे. त्या पदाचा गैरवापर करत आहेत. ओबीसीचे सगळे नेते माझ्या विरोधात उभे करण्याचे काम छगन भुजबळ यांनी केल्याचे जरांगे म्हणाले. मी माझा समाज एका बाजुला आहे. सगळे ओबीसीचे नेते एका बाजुला आहे. नेते राजकीय स्वार्थासाठी काम करत असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.

आम्ही आमची शक्ती दाखवतो
अजित पवार हे सत्तेत आहेत. त्यांचे लोक छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे हे मराठ्यांना लक्ष्य करत आहेत. आता तुम्ही भोगा असेही जरांगे म्हणाले. आम्ही महायुती आणि महाविकास आघाडी यांना बघायला आलो नाही असेही जरांगे म्हणाले. हे फक्त वेळ मारुन नेत असल्याचे जरांगे म्हणाले. आम्ही कोणाच्या फायद्यासाठी कामच करत नाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फायदा लक्षात घेऊन राजकारण होत असेल तर चूक आहे. आम्ही आमची शक्ती दाखवतो असेही जरांगे म्हणाले.

मराठ्यांना लक्ष्य करु नका
बीडच्या सभेला परवानगी नाकारण्यात आली असे संदेश आले आहेत. मात्र, धंनजय मुंडे यांनी सांगितले की तसे काही नाही. कोणीतरी अफवा पसरवत आहे. याबाबत धनंजय मुंडे यांचे कौतुक आहे. तुमच्या लोकांकडून मराठ्यांना त्रास होत आहे. त्यांना आवरा असेही जरांगे पाटील म्हणाले. बीड जिल्ह्यातील अनेक गावात मराठ्यांना गावात जाऊन शिवीगाळ करण्यात आली हे होऊ देऊ नका असे जरांगे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR