27 C
Latur
Monday, February 24, 2025
Homeमहाराष्ट्रकाम बंद करा नाहीतर हातपाय तोडू

काम बंद करा नाहीतर हातपाय तोडू

वाल्मिक कराडचे खंडणीचे कॉल रेकॉर्डिंग सीआयडीच्या हाती

बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे. वाल्मिक कराडने दिलेल्या खंडणीसाठी केलेल्या फोनचे रेकॉर्डिंग सीआयडीच्या हाती लागले आहे. विष्णु चाटेच्या मोबाईलवरून धमकी देण्यात आली होती. अवादा कंपनीच्या अधिका-याकडे विष्णू चाटेच्या मोबाइलवरून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली. मागणी पूर्ण न केल्यास हातपाय तोडण्यासह कायमची वाट लावीन, अशी धमकी वाल्मीक कराड याने अधिका-याला दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याचे कॉल रेकॉर्डिंग आता सीआयडीच्या हाती लागली असून, आवाजाची तपासणी करणे सुरू झाले आहे. सुनील केदू शिंदे वय ४२, रा. नाशिक, ह. मु. बीड हे आवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्याकडे केज तालुक्यातील विविध ठिकाणी पवन ऊर्जा प्रकल्पाची मांडणी आणि उभारणीचे काम आहे.

२९ नोव्हेंबर रोजी सुनील शिंदे यांच्या मोबाईलवर विष्णू चाटे याने फोन केला. वाल्मिक अण्णा बोलणार आहेत असे सांगितले. ज्या परिस्थितीमध्ये सुदर्शनने सांगितले आहे, त्या परिस्थितीत काम बंद करा, अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील, काम चालू केले तर याद राखा असे म्हणून काम बंद करण्याची धमकी दिली. त्याच दिवशी घुले कार्यालयात आला. काम बंद करा अन्यथा तुमचे हातपाय तोडू, अशी धमकी दिली. काम चालू ठेवायचे असेल तर दोन कोटी रुपये द्या असे सांगितले होते. याचे सर्व कॉल रेकॉर्डिंग शिंदे यांच्या मोबाइलमध्ये झाले आहे. त्यावरून गुन्हा दाखल झाला होता. हेच रेकॉर्डिंग सीआयडीच्या हाती लागले आहे. तो आवाज कराड, चाटे याचाच आहे का? यासाठी व्हाइस सॅम्पल घेतले जात आहेत.

कराडसोबत आलेल्यांची चौकशी?
वाल्मिक कराड हा ३१ डिसेंबर २०२४ रोजी पुण्यात शरण आला. यावेळी त्याच्यासोबत दोन व्यक्त्ती आणि पांढरी गाडी होती. ही गाडी आता सीआयडीने जप्त केली आहे. गाडीमालक शिवलिंग मोराळेसह अन्य मदत करणारे लोक देखील आता सीआयडीच्या रडारवर आहेत. विष्णु चाटे याची पोलिस कोठडी संपणार आहे. त्यासाठी लवकरात लवकर त्याविरोधात सीआयडी पुरावे गोळा करत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR