26.7 C
Latur
Monday, July 8, 2024
Homeमहाराष्ट्रसमृद्धी महामार्गावर तुफान हाणामारी

समृद्धी महामार्गावर तुफान हाणामारी

टोल कर्मचा-यांवर रोखली पेट्रोल पंप चालकाने रिव्हॉल्व्हर

बुलडाणा : अपघातामुळे नेहमीच चर्चेत असलेल्या समृद्धी महामार्गावर आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर पेट्रोल पंप चालक आणि टोल कर्मचा-यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. बुलडाणा जिल्ह्याच्या दुसरं बीड समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर हा संपूर्ण प्रकार घडला असून यात पेट्रोल पंप चालकाने टोल कर्मचा-यांवर चक्क रिव्हॉल्व्हर रोखल्याचे दृश्य टोल नाक्यावर लागलेल्या सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाले आहे.

हाणामारीच्या या घटनेत चार जण गंभीर जखमी झालेची माहिती समोर अली आसून जखमींवर सध्या जालना येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र दिवसा ढवळया घडलेल्या हा थरारक घटनेने सर्वत्र एकच दहशत निर्माण झाली आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून आतापर्यंत या प्रकरणात बिबी पोलीसात पेट्रोल पंप चालक आणि इतर चार जाणांविरुद्ध आर्म अ‍ॅक्ट आणि इतर अनेक कलमांसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्राच्या विकासाची भाग्यरेषा ठरलेला समृद्धी महामार्ग प्रवाशांच्या दृष्टीने अतिशय महत्वाकांशी आणि सोईचा ठरला आहे. असे असले तरी, गेल्या कित्येक वर्षांपासून समृद्धी महामार्ग या-ना त्या कारणांनी चर्चेत राहिला आहे. त्यात कधी घडत असलेले अपघात असतील, तर कधी महामार्गावर होणा-या प्रवाशांची लूट असेल. अशा काही गैरप्रकारामुळे समृद्धी महामार्गाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे. अशातच आता समृद्धी महामार्गावर आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर भर दिवसा पेट्रोल पंप चालक व टोल कर्मचा-यांमध्ये सशस्त्र मारामारीची घटना घडली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR