नुकु अलोफा : थायलंड आणि म्यानमारनंतर आता आता टोंगामध्ये भीषण मोठा भूकंप झाला असून या भूकंपाची तीव्रता ७.१ रिश्टर स्केल एवढी नोंदविण्यात आली आहे. ज्यामुळे पॅसिफिक बेट राष्ट्राला त्सुनामीचा इशारा देण्यात आला असून स्थानिक वेळेनुसार सोमवारी सकाळी मुख्य बेटाच्या ईशान्येला सुमारे १०० किलोमीटर(६२ मैल) अंतरावर भूकंप झाल्याचे यूएस भूगर्भीय सर्वेक्षणाने सांगितले.
टोंगा हा पॉलिनेशियामध्ये स्थित एक देश असून १७१ बेटांचा बनलेला आहे. या देशाची लोकसंख्या फक्त १००,००० आहे, त्यापैकी बहुतांश टोंगा मुख्य बेटावर राहतात. हे ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किना-यापासून ३,५०० किलोमीटर (२,००० मैल) अंतरावर आहे. दरम्यान, या भूकंपानंतर पॅसिफिक त्सुनामी केंद्राने एक अलर्ट जारी केला आहे. यानुसार, धोकादायक लाटा भूकंपा केंद्राच्या ३०० किलोमीटर(१८५ मैल) आत किनारपट्टीवर आदळू शकतात.
म्यानमार आणि थायलंडमध्ये भूकंपामुळे प्रचंड विध्वंस
शुक्रवारी म्यानमार आणि शेजारील थायलंडमध्ये शक्तिशाली भूकंप झाला, ज्यामध्ये दोन्ही देशांमधील १,७००+ लोकांचा मृत्यू झाला, तर सुमारे ३,४०० लोक जखमी झाले. या भूकंपामुळे शेकडो इमारती उद्ध्वस्त झाल्या, पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले.