24.3 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रकोल्हापुरात विद्यार्थ्यांच्या सहल बसवर अज्ञातांकडून दगडफेक

कोल्हापुरात विद्यार्थ्यांच्या सहल बसवर अज्ञातांकडून दगडफेक

कोल्हापूर : कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौक इथे शालेय विद्यार्थ्यांच्या सहल बसवर दगडफेक करण्यात आली. सहलीच्या बससह इतर आजूबाजूच्या चारचाकी वाहनांवरही दगडफेक करण्यात आली. काही अज्ञातांकडून ही दगडफेक करण्यात आली आहे.

सर्व भाविक आणि पर्यटकांच्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था दसरा चौकात करण्यात आलेली आहे. याच ठिकाणी उभ्या असलेल्या शाळेच्या एका बसवर अज्ञातांनी दगडफेक केली. त्याचबरोबर आणखी दोन चारचाकी वाहनांची तोडफोड अज्ञातांनी केली. या तोडफोडीमागचे कारण अद्याप समजू शकले नाही.

कोल्हापुरात बुधवार सकाळपासून अतिक्रमणच्या मुद्द्यावरुन गोंधळ सुरु असताना संध्याकाळी वाहनांवर दगडफेकीचा प्रकार घडला. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR