22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeपरभणीस्वयंशासन दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी पार पाडल्या विविध भुमिका

स्वयंशासन दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी पार पाडल्या विविध भुमिका

बोरी : येथील ज्ञानोपासक विद्यालयात १० वीच्या विद्यार्थ्यांनी स्वयंशासन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक ते सेवकापर्यंतच्या सर्व भुमिका निभावत शाळेचे संपूर्ण कामकाज पाहिजे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका दुर्गा देशमुख होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून नेमिनाथ जैन, संतोष तायडे उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या पूजनाने परिपाठाची सुरवात करण्यात आली. यात मुख्याध्यापक माध्यमिक म्हणून सुमित ढोले यांनी कार्यभार सांभाळला, उपमुख्याध्यापक म्हणून यश गोरे यांनी भार स्वीकारला तर पर्यवेक्षक म्हणून आदिती भोसले हिने कार्यभार सांभाळला. प्राथमिकचे मुख्याध्यापक म्हणून सर्वज्ञ वाघमारे, प्रशासकीय अधिकारी म्हणून स्वराज डोंबे यांनी कार्य पाहिले.

ग्रंथपाल म्हणून मोहन पावडे, क्रीडा शिक्षक म्हणून जय हुंडेकर व दिव्याश ओझा व सेवक म्हणून रोहित गोरे, मुकेश खिस्ते, नारायण इंगोले, लिपिक म्हणून करण हरकळ यांनी काम पाहिले. या स्वयंशासन दिनामध्ये एकूण ६५ विद्यार्थी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सांस्कृतिक प्रमुख दत्तात्रय जाधव, अशोक भोसले, प्रशांत भरणे, नरेंद्र टाले, मनोहर सोनवळे, राजेश ढोबळे, रमेश भारती व सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR