32.6 C
Latur
Monday, February 26, 2024
Homeपरभणीखोटारड्या लोकांच्या आरोपांना उत्तर देणार नाही : आ. मेघना बोर्डीकर

खोटारड्या लोकांच्या आरोपांना उत्तर देणार नाही : आ. मेघना बोर्डीकर

जिंतूर : जिंतूर शहरात निघालेल्या शेतक-यांच्या आक्रोश मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आ.विजय भांबळे यांनी विद्यमान आमदारांना फेसबुक आमदार म्हणत विविध आरोप करत काय विकास केला असा सवाल केला होता. यानंतर पत्रकारांनी फोन करून मला विचारले होते परंतू आपण कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. कारण मी खोटरड्या लोकांच्या खोट्या आरोपांच्या प्रश्नांना अजिबात उत्तर देणार नाही असे रोखठोक प्रतिपादन आ. मेघना बोर्डीकर यांनी केले आहे.

शहरातील उस्मानपुरा परिसरातील अबबुकर सिद्दीकी उर्दू प्राथमिक शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी उभारलेल्या स्टॉलच्या आनंद नगरीचे उद्घाटन भाजप आ.मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते दि.‌१० फेब्रुवारी रोजी करण्यात आले. यावेळी आ. मेघना बोर्डीकर बोलत होत्या. अबबुकर सिद्दीकी ऊर्दू प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षक व पालकांच्या मदतीने विविध व्यावसायिक ९७ स्टॉल थाटले होते. सुत्रसंचलन शिक्षक मौलाना जकेरीया तर प्रास्ताविकात मुख्याध्यापक शेख माबुद कुरेशी यांनी विद्यार्थी संख्या भरपूर असून भौतिक सुविधा मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात आ. मेघना बोर्डीकर यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास अंतर्गत मुस्लिम समाजाच्या विकासासाठी विविध योजना लागू केल्या आहेत. अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाच्या नागरिकांनी शिक्षणातून आपला विकास साध्या करावा. जिंतूरात ऊर्दू भाषेत शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या परिश्रमातून मोठ मोठ्या पदांवर पोहचले आहेत.

यावेळी आ. मेघना बोर्डीकर, केंद्र प्रमुख घुगे, मौलाना तजमुल अहेमद, माजी नगरसेवक अ.रहेमान लाडले, अ.मुखीद, प्राचार्य असेफखान पठाण, जावेद कुरेशी, काळी मस्जिद कमेटीचे अध्यक्ष मसुद खान पठाण, दत्ता कटारे, अ‍ॅड. साजीद कुरेशी, पत्रकार संघाचे अध्यक्ष शकील अहमद, रामप्रसाद कंठाळे, रियाज चाऊस, शेख अलीम, मौलाना अनीस खान, शेख नसीर आदी मंडळींच्या उपस्थितीत आनंद नगरीचे उद्घाटन आ. मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते झाल्यावर मुलांच्या स्टॉलला भेट देत चिमुकल्याकडून खरेदी करत पदार्थांचा आस्वाद घेतला. सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक बांधवांनी फार छान कार्यक्रम घेतल्याने त्यांचे अभिनंदन करुन कौतुकाची थाप दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकसह सर्व शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले होते.

१ कोटी रुपयांचा निधी लवकरच देणार
अबबुकर सिद्दीकी ऊर्दू शाळेला भव्य इमारतीसाठी ५० लाखांचा निधी दिला होता. मात्र शाळेला आवश्यक असलेल्या भौतिक सुविधांची गरज पाहता यापुढे या शाळेला १ कोटी रुपयांचा निधी लवकरच देणार असल्याचे आश्वासन आ. मेघना बोर्डीकर यांनी यावेळी दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR