22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeउद्योगविद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांचे शैक्षणिक कर्ज

विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांचे शैक्षणिक कर्ज

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळवार संसदेत मोदी सरकार ३.० चा अर्थसंकल्प सादर करत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी सादर केलेला हा सातवा अर्थसंकल्प आहे. यापूर्वी, हे निवडणुकीचे वर्ष असल्याने १ फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात कोणतेही महत्त्वपूर्ण धोरणात्मक बदल दिसून आलेले नाहीत.

तसेच मध्यमवर्गीयांसाठी विशेष घोषणांचा समावेश सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पात करण्यात आलेला नाही. मात्र, या अर्थसंकल्पामध्ये महिला, शेतकरी, विद्यार्थी, तरूण, रोजगार यांच्यासाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. तर या अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांना १० लाख रूपयांचे उच्च शैक्षणिक कर्ज देणार असल्याची घोषणा अर्थमंत्रा निर्मला सीतारामन यांनी केली आहे. अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी उच्च शिक्षणासाठी १० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी सरकारकडून आर्थिक मदत जाहीर केली.

दरवर्षी एक लाख विद्यार्थ्यांना ई-व्हाऊचर
कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेऊ न शकणा-या विद्यार्थ्यांसाठी सरकारने त्यांच्या उच्च शिक्षणासाठी १० लाख रुपयांचे कर्ज जाहीर केले आहे. ही मदत विशेषत: अशा विद्यार्थ्यांना दिली जाईल जे कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. यासाठी दरवर्षी एक लाख विद्यार्थ्यांना ई-व्हाऊचर दिले जाणार असल्याची मोठी घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे.

निर्मला सीतारामन यांनी ५ योजना जाहीर केल्या
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पाच योजनांसाठी पंतप्रधान पॅकेज जाहीर केले. त्यांचा उद्देश रोजगार आणि प्रशिक्षण मजबूत करणे हा आहे. यासाठी सरकारने दोन लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. विशेष म्हणजे यावर्षी शिक्षण, रोजगार आणि प्रशिक्षणासाठी १.५४ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR