21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeसोलापूरदीडशे कोटी रुपये थकहमीवर कर्ज देण्याचा प्रस्ताव सादर

दीडशे कोटी रुपये थकहमीवर कर्ज देण्याचा प्रस्ताव सादर

करमाळा( प्रतिनिधी)
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला राज्य सरकारने थक हमीवर 150 कोटी रुपये कर्ज द्यावे असा प्रस्ताव प्रादेशिक सहसंचालक साखर सोलापूर विभागाने साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे सादर केला आहे. प्रादेशिक सहसंचालक साखर पांडुरंग साठे यांनी पत्र क्रमांक 16 27//2023 प्रमाणे हा प्रस्ताव साखर आयुक्त पुणे यांच्याकडे सादर केला आहे.

महाराष्ट्रातील जवळपास आजारी असलेल्या 27 साखर कारखान्याला यापूर्वी राज्य शासनाने थकहमीवर कर्ज देऊन या कारखान्यांना ऊर्जीत अवस्था आणली आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची स्वतःच्या मालकीची अडीचशे एकर जमीन असून जवळपास 300 कोटी रुपयांची मशिनरी आहे मात्र केवळ शंभर कोटी रुपये कर्जासाठी हा कारखाना अडचणीत आला असून या कारखान्याला राज्य शिखर बँकेकडून दीडशे कोटी रुपये कर्ज देऊन शासनाने या आजारी कारखान्याला मदत करावी अशी मागणी प्रशासकीय मंडळ अध्यक्ष बाळासाहेब बेंद्रे संचालक महेश चिवटे संजय गुटाळ यांनी केली होती.

एनसीडीसी बँक दिल्ली यांचे 25 कोटी व राज्य शिखर बँकेचे 21 कोटी रुपये थकलेले आहेत
शिवाय कर्मचाऱ्यांची देणे इतर शासकीय देणे प्रलंबित असून कारखान्याचे बाहेरून येणे जवळपास 15 कोटी रुपये आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला पुन्हा उर्जित अवस्था आणण्यासाठी दीडशे कोटी रुपये कर्ज देण्याचा प्रस्ताव शासन दरबारी दाखल झाला आहे हा प्रस्ताव दाखल झाल्यामुळे आदिनाथ कारखान्याचे सभासद व कर्मचारी व तालुक्यातील जनतेच्या मनात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आदिनाथ कारखाना बंद पाडावा या दृष्टीने अनेक राजकीय नेते मंडळी कटकारस्थानी करत असताना अनेक अडचणीला तोंड देत आदिनाथ कारखाना अजूनही टिकून आहे. आदिनाथ कारखाना भावी काळात स्पर्धेत टिकला पाहिजे.आदिनाथ कारखान्याचा वजन काटा पारदर्शक असल्यामुळे शेतकऱ्यांचा या कारखान्यावर विश्वास आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखाना तालुक्याचा स्वाभिमान असून हा कारखाना सहकार तत्वावर चालला पाहिजे अनेक हजारो कुटुंबाचे प्रपंच या कारखान्यावर अवलंबून आहेत हा कारखाना वाचवण्यासाठी शासनाने तात्काळ याला आर्थिक मदत करावी अशी मागणी प्राध्यापक रामदास झोळ केली आहे. आदिनाथ कारखाना सक्षम करण्यासाठी आर्थिक मदतीची गरज असून जिल्ह्यातील इतर कारखान्यांना ज्या पद्धतीने राज्य शासनाने मदत केली आहे त्याच पद्धतीने आदिनाथ व शासनाने मदत करणे गरजेचे आहे याबाबतीत लवकरच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आदिनाथ ला मदत करण्याची विनंती करणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR