नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवार दि. ११ मार्च रोजी डीआरडीओच्या शास्रज्ञांच्या नव्या यशस्वी चाचणीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. डीआरडीओने मिशन दिव्यास्त्रची यशस्वी चाचणी केली आहे. पंतप्रधान मोदींनी डीआरडीओ शास्त्रज्ञांचे मिशन दिव्यास्त्र या नावाने स्वदेशी बनावटीच्या अग्नी-५ क्षेपणास्त्राची पहिली उड्डाण चाचणी यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल अभिनंदन केले आहे. डीआरडीओ म्हणजे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था. डीआरडीओच्या आणखी एका यशस्वी चाचणीसाठी शुभेच्छा देत मोदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान मोदींनी अधिकृत एक्स मीडिया अकाऊंटवर ट्वीट करत म्हटले आहे की मिशन दिव्यस्त्रासाठी आमच्या डीआरडीओ शास्त्रज्ञांचा अभिमान आहे, मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल तंत्रज्ञानासह स्वदेशी विकसित अग्नी-५ क्षेपणास्त्राची पहिली उड्डाण चाचणी यशस्वी असे मोदींनी ट्विटर पोस्टमध्ये म्हटले आहे. मिशन दिव्यास्र अंतर्गत अग्नी-५ क्षेपणास्त्राची पहिली उड्डाण चाचणी यशस्वी झाली आहे.या क्षेपणास्रामध्ये मल्टीपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल तंत्रज्ञान आहे. अचूक लक्ष्य भेदण्यासाठी याचा वापर होतो.