29.7 C
Latur
Tuesday, February 11, 2025
Homeमहाराष्ट्रअचानक लोकल ट्रेनमध्ये मोबाईलचा स्फोट

अचानक लोकल ट्रेनमध्ये मोबाईलचा स्फोट

प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ

ठाणे : कल्याणकडे जाणा-या लोकलच्या महिलांच्या डब्यात सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास एका महिलेच्या पर्समधील मोबाइलचा अचानक स्फोट झाला. त्यामुळे लोकलच्या डब्यात आग लागून धूर पसरला आणि काही काळासाठी प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

कळवा स्थानकात ही घटना घडली. या घटनेमुळे घबराट उडाली. परंतु मोटरमनच्या केबिनमधील गार्डने प्रसंगावधान राखत अग्निरोधकाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. आगीवर नियंत्रण मिळविल्यानंतर लोकल कल्याणकडे रवाना झाली.

या प्रकरणी ठाणे महानगरपालिकेच्या अधिका-यांनी माहिती दिली. सोमवारी रात्री ८.१२ वाजता कळवा स्थानकावर सीएसएमटी-कल्याण उपनगरीय ट्रेनमध्ये मोबाईल फोनचा स्फोट झाला. त्यामुळे ट्रेनमध्ये गोंधळ उडाला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या अहवालानुसार, या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. घटनेनंतर ट्रेनमध्ये गोंधळ उडाला. तसेच, स्फोटामुळे धूरही पसरला. त्यानंतर रेल्वे कर्मचा-यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशामक यंत्रांचा वापर केला. ट्रेनमध्ये असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, ट्रेनमध्ये मोबाईल फोनचा स्फोट झाल्यामुळे स्फोट झाला, यामुळे डब्यातील सगळेच घाबरले. या स्फोटामुळे डब्बामधून धूर झाला.यामुळे अनेक प्रवासी उतरण्यासाठी दरवाजाकडे धावले. यावेळी लगेच रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR