सोलापूर : कौटुंबिक कारणातून सातवीत शिकणाऱ्या मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि. २५) सायंकाळी ७वाजेच्या सुमारास घडली.
प्रियदर्शनी शिंगे (१२, रा. इंदिरानगर) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.शुक्रवारी सायंकाळी तिचे वडील कामासाठी बाहेर केले होते. त्याचवेळी आईही बाहेर गेली होती. यावेळी प्रियदर्शनीने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. ही घटना तिच्या काकूने पाहिल्यानंतर तिने तिच्या पित्याला फोनद्वारे सांगितले. त्यानंतर लगेच ही घटना पोलिसांना कळवली. त्यानंतर पोलिसांनी नातेवाइकांच्या मदतीने खाली उतरवून तिला उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
सदर बाझार पोलिस ठाण्याचे पोलिस हेड कॉस्टेबल रफीक इनामदार हे पुढील तपास करत आहेत. दरम्यान, शनिवारी शवविच्छेदन करण्यात आले. यात तिचा मृत्यू गळफास घेतल्याने झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.