30.7 C
Latur
Saturday, May 4, 2024
Homeनांदेडमराठा आरक्षणासाठी नववीत शिकणा-या मुलीची आत्महत्या

मराठा आरक्षणासाठी नववीत शिकणा-या मुलीची आत्महत्या

नांदेड : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यात सोमेश्वर गावातील नववीत विध्यार्थीने आत्महत्या केली आहे. कोमल तुकाराम बोकारे असे तरुणीचे नाव आहे. इयत्ता नववी शिकणा-या कोमल हिने स्वत:चा घरात चिठ्ठी लिहून गळफास घेत आत्महत्या केली आहे.

मराठा समाजाला आरक्षण लवकर द्यावे, माझा बलिदान व्यर्थ जाऊ नये, आई अण्णा मला माफ करा, असे कोमलने सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवले आहे. नांदेड जिल्ह्यातील मराठा आरक्षणासाठी ही पाचवी आत्महत्या आहे.

मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणा-या कोमलचे वडील हे अल्पभूधारक शेतकरी आहे. फक्त एक एकर शेती आहे. घरात एकुण पाच मुली आहे. दरम्यान, शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कोमलचे वडील करत आहे. अशात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोमलने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याने बोकारे कुटुंबावर दु:खाचे डोंगर कोसळले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR