सोलापूर : स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शेकडो कोटी रुपये खर्चुन करण्यात आलेल्या २० पैकी १७ प्रोजेक्ट हे बंद पडले आहेत. या कामांचा बट्ट्याबोळ झाला आहे. तेव्हा या योजनेअंतर्गत झालेल्या सर्व कामांचे कॅगच्या मार्फत ऑडिट करण्यात यावे अशी मागणी सोलापूर विकास मंचच्या वतीने केंद्र व राज्य शासनाकडे करण्यात आली असल्याची माहिती सदस्य विजय जाधव आणि केतन शहा यांनी दिली.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सोलापूर शहरात शेकडो कोटी रुपयांचा निधी खर्चुन विविध २० प्रकल्पाचे काम करण्यात आले. या २० पैकी सुमारे १७ प्रकल्प बंद पडले आहेत. लेसर शो, टॉय ट्रेन, एडवेंचर पार्क, रंगभवन प्लाझा, हुतात्मा बाग, ई टॉयलेट यासह इतर १७ कामांचा बट्ट्याबोळ झाला आहे. बहुतांश प्रकल्प बंद पडले आहेत. यामुळे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत झालेल्या या सर्व कामांचे ऑडिट काच्या मार्फत करण्यात यावे अशी मागणी केंद्र व राज्य शासनाकडे सोलापूर विकास मंचच्या वतीने करण्यात आली आहे. यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे.
महत्त्वकांक्षी मानल्या जाणाऱ्या या स्मार्ट सिटी योजनेतून ज्या उद्देशातून ही कामे करण्यात आली तो उद्देश सफल झाला नाही. केवळ नावापुरते हे प्रकल्प उभारण्यात आले. त्यानंतर देखभाल दुरुस्ती झाली नाही. काही सुरू केल्यानंतरच बंद पडले. ही गंभीर बाब आहे. मोठ्या प्रमह्याणात खर्च करण्यात आला मात्र त्याचा उपयोग झाला नाही. ही शोकांतिका आहे. त्यामुळे तातडीने या सर्व कामांचे ऑडिट होण्याची गरज आहे, असे केतन शहा आणि विजय जाधव यांनी यावेळी स्पष्ट केले.