26.6 C
Latur
Sunday, March 16, 2025
Homeअंतरराष्ट्रीयआठवडा अखेरीस सुनीता विलियम्स पृथ्वीवर

आठवडा अखेरीस सुनीता विलियम्स पृथ्वीवर

नासाचे रॉकेट पोहचले, सहका-यांना पाहून आनंद

न्यूयॉर्क : मागील ९ महिन्यापासून अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर अंतराळात अडकली आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे ८ दिवसात परतणा-या सुनीता विलियम्स यांना ९ महिने अंतराळातच घालवावे लागले परंतु आता नासा आणि स्पेसएक्सचे क्रू १० मिशन अंतराळ स्थानकात पोहचले आहे. सुनीता आणि बुच यांना हे यान पुन्हा पृथ्वीवर घेऊन येणार आहे. नासा आणि स्पेसएक्सचे यान अंतराळात पोहचल्यानंतर त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत.

अंतराळात सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांना आणण्यासाठी फाल्कन ९ रॉकेटच्या माध्यमातून क्रू १० मिशन ड्रॅगन स्पेसक्राफ्ट अंतराळात पोहचले आहे. या यानातून अंतराळात गेलेले अंतराळवीर यांनी सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांची भेट घेतली. पृथ्वीवर परत नेण्यासाठी पोहचलेल्या अंतराळ यानातून उतरलेल्या इतरांना पाहून सुनीता आणि बुच यांच्या चेह-यावर आनंद पसरला होता. हे दोघेही त्यांच्या इतर अंतराळ सहका-यांना पाहून खुश झाले आणि गळाभेट घेऊन त्यांचे स्वागत केले.

त्यानंतर सर्वांनी डान्स केला, जल्लोष केला. नासाचे अंतराळवीरांना घेऊन गेलेले फाल्कन ९ रॉकेट सकाळी ९.४० मिनिटांनी अंतराळ स्थानकात पोहचले. अंतराळात जाणा-या सदस्यांपैकी अमेरिकेचे २ अंतराळवीर एक मॉक्कलेन आणि निकोल आयर्स आहेत. त्याशिवाय जपानचे तुकुया ओनिशी आणि रशियाचे किरिल पेस्कोव हेदेखील आहेत.

आठवडाभरात पृथ्वीवर पोहचण्याची अपेक्षा
क्रू १० सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांच्याकडे पोहचले आहेत, परंतु आता काही दिवस ते अंतराळ स्थानकात काही माहिती जमा करतील. त्यानंतर आठवडाभरात सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर स्पेस एक्स कॅप्सूलच्या माध्यमातून इतर सहका-यांसोबत पृथ्वीवर परतण्याची अपेक्षा आहे. जर वातावरण ठीक असेल तर स्पेस कॅप्सूल बुधवारी १९ मार्च आधीच स्पेस स्टेशनहून फ्लोरिडाच्या किनारपट्टीवर लँड करेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR