34.3 C
Latur
Wednesday, May 14, 2025
Homeमनोरंजनसनी देओलने केली ‘बॉर्डर २’ची घोषणा

सनी देओलने केली ‘बॉर्डर २’ची घोषणा

मुंबई :
अभिनेता सनी देओलने आगामी चित्रपट ‘बॉर्डर २’ ची नुकतीच घोषणा केली आहे. सनी देओलचा ‘गदर २’ रिलीज झाल्यानंतर त्याचा ‘बॉर्डर २’ चित्रपटाची जोरदार चर्चा झाली होती. तेव्हापासून हा चित्रपट चर्चेत होता.

अखेर आता चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. यासोबतच एकीकडे सनी ‘लाहौर १९४७’चे शूटिंग करत आहे. तर दुसरीकडे ‘बॉर्डर २’ ची घोषणा झाल्यामुळे चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. या चित्रपटाची सोशल मीडियावर घोषणा करताच चाहते आनंद व्यक्त करत आहेत.

१९९७ साली रिलीज झालेल्या सनी देओलच्या ‘बॉर्डर’चा सीक्वल ‘बॉर्डर २’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाच्या सीक्वलमधून सनी देओल कमबॅक करतो आहे. तब्बल २७ वर्षांनंतर या सिनेमाचा सीक्वल येतो आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR