मुंबई : गेल्या काही दिवसांपासून धनुष मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूरला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ते दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याचे देखील म्हटले जात आहे. दोघांच्या डेटिंगच्या अफवा तेव्हा सुरू झाल्या जेव्हा धनुष ‘सन ऑफ सरदार’च्या इव्हेंटमध्ये गेस्ट लिस्टमध्ये सामील झाला होता आणि नंतर त्याला मृणालच्या वाढदिवसाच्या पार्टीतही स्पॉट करण्यात आले. तेव्हापासून चाहते अंदाज लावत आहेत की या दोघांमध्ये काही तरी आहे.
विशेष म्हणजे मृणाल ठाकूर धनुषच्या बहिणींना सोशल मीडियावर फॉलो करते.
धनुषने घटस्फोट घेतल्यानंतर आता त्याच्या आयुष्यात पुन्हा प्रेम खुलत असल्याचे दिसत आहे. धनुष हा एका मराठमोळया अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता ही अभिनेत्री कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. या अभिनेत्रीने धनुषच्या बहिणीला देखील सोशल मीडियावर फॉलो करण्यास सुरुवात केली आहे. फिल्म इंडस्ट्रीमधील कलाकारांचे अफेअर्स-ब्रेकअप, लग्न-घटस्फोट हे कायमच चर्चेत असतात. कोणता अभिनेत्या कोणत्या अभिनेत्रीला डेट करत आहे याविषयीची माहिती आजकाल लगेच लीक होताना दिसते.
काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता धनुषने रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्याला घटस्फोट दिला. त्यानंतर आता त्याच्या आयुष्यात एका नव्या मुलीची एण्ट्री झाल्याचे दिसत आहे. तो एका अभिनेत्रीला डेट करत असून ही अभिनेत्री धनुषच्या बहिणीला देखील फॉलो करत असल्याचे दिसत आहे. धनुषला दोन मोठ्या बहिणी आहेत, डॉ. कार्तिका कार्तिक आणि विमला गीता. मृणाल या दोघींना इन्स्टाग्रामवर फॉलो करते आणि अभिनेत्याच्या बहिणीही मृणालला फॉलो करतात. यामुळे धनुष आणि मृणालच्या डेटिंगच्या अफवा आता आणखी जोर धरु लागल्या आहेत.