रांची : झारखंड मुक्ती मोर्चा विधिमंडळ पक्षाचे नेते, चंपई सोरेन यांनी नवीन सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली पाहिजे अशी मागणी झारखंडच्या राज्यपालांकडे केली याविषयीची माहिती त्यांनीच प्रसार माध्यमांना दिली. ते म्हणाले, राज्यपालांनीही आम्हाला आश्वासन दिले आहे की, ही प्रक्रिया लवकरच सुरू होईल. सध्या आम्ही अहवाल सादर केला असून आमच्याकडे ४३ आमदारांचा पाठिंबा आहे. आम्हाला आशा आहे की संख्या ४६-४७ पर्यंत पोहोचेल त्यामुळे कोणतीही अडचण नाही. आमचे ‘गठबंधन’ खूप मजबूत आहे, असेही चंपई सोरेन म्हणाले.