15.4 C
Latur
Wednesday, January 8, 2025
Homeक्रीडासुर्याने शतकासह नोंदवला विक्रम

सुर्याने शतकासह नोंदवला विक्रम

जोन्हासबर्ग : सूर्यकुमार यादवने आज जोहान्सबर्गचे मैदान दणाणून सोडले. भारतासाठी महत्त्वाच्या लढतीत सूर्याने कॅप्टन्स इनिंग खेळली. यशस्वी जैस्वालच्या अर्धशतकानंतर सूर्याने सामन्याची सर्व सूत्रे हाती घेतली आणि शतक झळकावले. त्याचे हे ट्वेंटी-२०तील चौथे शतक ठरले आणि तेही ५७ इनिंग्जमध्ये त्याने हा पराक्रम केला. ग्लेन मॅक्सवेल ( ९२) व रोहित शर्मा ( १४०) यांच्याही नावावर आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त सर्वाधिक चार शतकं आहेत, पण, सूर्या त्यांच्यापेक्षा फास्ट निघाला.

शुबमन गिल व यशस्वी जैस्वाल यांनी आज टीम इंडियाला आक्रमक सुरुवात करून दिली. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. गिल व यशस्वी या दोघांनी संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. पण, तिसऱ्या षटकात केशव महाराजने धक्का दिला आणि गिल १२ धावांवर पायचीत झाला. तिलक वर्माला घाई नडली अन् पहिल्याच चेंडूवर तो झेल देऊन परतला. महाराजची हॅटट्रीक हुकली, परंतु गिलने घेतला असता तर तो नाबाद राहिला असता. सूर्यकुमार यादवने पुन्हा एकदा जोरदार फटकेबाजी केली आणि यशस्वीची त्याला साथ मिळाली. तब्रेझ शम्सीच्या चेंडूवर सूर्यासाठी पायचीतची जोरदार अपील झाले आणि आफ्रिकेने घेतला. चेंडू पिचच्या बाहेर पडल्याने सूर्या बचावला.

यशस्वीने ३४ चेंडूंत ट्वेंटी-२०तील तिसरे अर्धशतक पूर्ण केले. सूर्यानेही हात मोकळे करताना चांगले फटके खेचले. या दोघांनी ७० चेंडूंत ११२ धावांची भागादीर केली. १४व्या षटकात शम्सीने सलामीवीर यशस्वीला ६० धावांवर ( ४१ चेंडू, ६ चौकार व ३ षटकार) माघारी पाठवले. सूर्यानेही आणखी एक अर्धशतक पूर्ण केले. सूर्याने आज आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तील विराटचा ११७ षटकारांचा विक्रम मोडला. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या ट्वेंटी-२०त क्विंटन डी कॉक हा सर्वोत्तम वैयक्ति ७९ धावा ( २०१९) करणारा कर्णधार होता आणि तो विक्रम आज सूर्याने मोडला. रिंकू सिंगनेही अखेरच्या षटकांत हात मोकळे केले. या दोघांची २६ चेंडूंतील ४७ धावांची भागीदारी १९व्या षटकात तुटली.

सूर्याने ५५ चेंडूंत शतक पूर्ण केले. पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. सूर्याने ५६ चेंडूंत ७ चौकार व ८ षटकारांसह १०० धावा केल्या. चार वेगवेगळ्या संघांविरुद्ध ट्वेंटी-२०त शतक झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला. भारताने ७ बाद २०१ धावा केल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR